अभिनेता सलमान खान (Salman Khan), त्याची बहिण अलवीरा खान (Alvira Khan) आणि त्याची ‘बीइंग ह्युमन’ (Being Human) कंपनी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चंदीगडमधील एका व्यापाऱ्याने यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. व्यापाऱ्याच्या तक्रारीची दखल घेत, चंदीगड पोलिसांनी सलमानसह सर्वांना समन्स बजावलं असून दहा दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. सलमान व त्याच्या बहिणीविरोधात तक्रार करणाऱ्या या व्यापाऱ्याचं नाव अरूण गुप्ता आहे. त्यांनी चंदीगडमध्ये ‘बीइंग ह्युमन’चं एक शोरूम उघडलं होतं. याच व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सलमान खान, अलवीरा खान, बीइंग ह्युमन कंपनीचा सीईओ प्रसाद कपारे, संतोष श्रीवास्तव, संध्या, अनुप, संजय मानव व आलोक यांना समन्स बजावला आहे.
काय आहे प्रकरण?तक्रारीनुसार, अरूण गुप्ता यांनी चंदीगडमध्ये बीइंग ह्युमनची एक शोरूम उघडली होती. या शोरूमवर त्यांनी 3 कोटी रूपये खर्च केलेत. शो रूमसाठी स्टाइल क्विंटेट जुलरी प्राय. लिमिटेडशी करारही केला. शोरूम तर उघडले. पण या शोरूमसाठी लागणारं सामान त्यांना मिळालं नाही. बीइंग ह्युमनची ज्वेलरी ज्या स्टोरमधून मिळणार होती,ते सुद्धा बंद आहे. या प्रकरणी अरूण गुप्ता यांनी बीइंग ह्युमनकडे अनेकदा तक्रार केली. परंतु त्यांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अखेर त्यांनी सलमान, त्याची बहिण अर्पिता आणि बिंग ह्युमन कंपनीविरोधात आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली. पुरावा म्हणून त्यांनी कंपनीसोबत केलेल्या लिखित कराराची कॉपी देखील जोडली आहे.या व्यवहारात त्यांनी गुंतवलेले पैसे त्यांना परत मिळावे, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे. अरूण गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सलमानचे खूप मोठे फॅन आहेत. सलमानवर विश्वास ठेवूनच त्यांनी गुंतवणूक केली होती. शोरुमच्या ओपनिंगसाठीस्वत: सलमान येणार होता. परंतु ऐनवेळी त्याने त्याचा मेहुणा आयुष शर्माला पाठवलं.