Join us

Salman Khan Arms Act Case: 'या' व्यक्तिमुळेच सलमान खानची झाली निर्दोष मुक्तता?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2017 12:26 PM

सलमान खानला आजपर्यंत त्याच्यावर असलेले आरोपाचे  खंडन करण्यासाठी कुटुंबापेक्षाही जास्त मेहनत याच व्यक्तिने घेतली आहे.जवळपास 18 वर्षानंतर अवैधरित्या शस्त्र ...

सलमान खानला आजपर्यंत त्याच्यावर असलेले आरोपाचे  खंडन करण्यासाठी कुटुंबापेक्षाही जास्त मेहनत याच व्यक्तिने घेतली आहे.जवळपास 18 वर्षानंतर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानची जोधपूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आणि त्या व्यक्तिच्या चेह-यावर क्षणातच हसू उमलल्याचे पाहायला मिळाले. होय, सलमान खानच्या प्रत्येक केसच्या सुनावणी वेळी हीच व्यक्ति सदैव सलमान खानच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सलमान खानची बहिण अलवीरा.या केससंदर्भात चर्चा करण्यासाठी सलमान पेक्षा जास्तवेळा अलवीरानेच जोधपुरच्या कोर्टात फे-या मारल्या असल्याचे खुद्द सलमानचे वकिल हस्‍तीमल सारस्‍वत यांनीच हे रहस्य मीडियाला सांगितले. प्रत्येक कठीण प्रसंगी अलवीराच सलमानच्या पाठीशी  खंबीर उभी  राहिली. विशेष म्हणजे सलमान खानवर असलेल्या सगळ्या केसेचे काम समलानची बहिण अलवीराच सांभाळते. जवळपास 18 वर्ष सूरू असलेल्या या केसचे कामही आलवीराच सांभाळत होती. सलमानच्या प्रत्येक केसवेळी आलवीरा कोर्टात हजर असते.सलमानचे वकील हस्तीमल सारस्वत यांच्याशी ती कायम संपर्क करून सलमानच्या केसविषयी चर्चा करत असते. केस संदर्भातली प्रत्येक गोष्ट अलवीरा समजून घेते,नेहमीच ती खूप काळजीपूर्वक केससंदर्भात चर्चा करते. याविषयी वकीलांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा अलवीरा केससंदर्भात चर्चा करायाची त्यावेळी फक्त आणि फक्त एकच गोष्टीचा ती उल्लेख करायची ते म्हणजे ''भाईची निर्दोष सुटका करा''. बुधवारी पहिल्यांदा अलवीराला या केसच्या सुनावणीनंतर खूप आनंदी पाहिल्याचे वकीलांनी सांगितले.यावरून या प्रसंगासाठी वेड्या बहिणीची ही वेडी माया ही ओळ यावेळी सार्थ ठरते.