Join us  

काय सांगता! 'सिंघम अगेन'मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री? अजय देवगण - सलमान खानचा फोटो लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 2:07 PM

सध्या सर्वांना उत्सुकता आहे सिंघम अगेन सिनेमाची. अशातच या सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय (singham again, salman khan, ajay devgn)

सध्या अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या 'सिंघम अगेन' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. 'सिंघम अगेन' हा बॉलिवूडचा मल्टिस्टारर सिनेमा असणार आहे. यात सुपरस्टार कलाकारांची फौज दिसणार आहे. अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार हे त्रिकूट पुन्हा एकदा 'सिंघम अगेन' निमित्ताने एकत्र येणार आहे. अशातच सर्वांना सुखद धक्का बसेल अशी बातमी समोर आलीय. 'सिंघम अगेन'मध्ये चुलबूल पांडेच्या भूमिकेत सलमान खानची एन्ट्री झालीय.

'सिंघम अगेन'मध्ये चुलबुल पांडे?

'सिंघम अगेन' सिनेमा दिवाळीत रिलीज होणार आहे. या सिनेमासंबंधी एक महत्वाची अपडेट समोर आलीय. 'सिंघम अगेन'मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री झालीय. सलमान खानचा अजय देवगणसोबतचा फोटो व्हायरल झालाय. या फोटोत अजयचा बाजीराव सिंघम आणि सलमानचा चुलबुल पांडे एकत्र दिसत आहेत. हा फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला असून सलमानची 'सिंघम अगेन'मध्ये एन्ट्री झाल्याने सर्वजण आनंदात आहेत, यात शंका नाही.

 'सिंघम अगेन' मध्ये खरंच दिसणार सलमान?

हा फोटो व्हायरल झाल्यावर अनेकांना वाटलं की, हा फोटो एडिट करुन खोटा बनवला आहे. पण अनेकांना वाटतंय की, सलमानची रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये एन्ट्री झालीय. यामागचं कारण म्हणजे 'चुलबुल पांडे या कॉप युनिव्हर्सचा भाग असेल का?', असा प्रश्न रोहितला विचारला गेला. त्यावेळी रोहित म्हणाला होता की, "हे जग वेगळंच आहे. इथे कधीही काहीही होऊ शकतं". त्यामुळे रोहितने या गोष्टीचा स्विकार केला नाही पण सलमानविषयीची गोष्ट नाकारली पण नाही. त्यामुळे 'सिंघम अगेन'मध्ये चुलबुल पांडेच्या भूमिकेत सलमान खान दिसला, तर सर्वांसाठी एक पर्वणी असेल, यात शंका नाही.

टॅग्स :सलमान खानअजय देवगणदबंग 3