बॉलिवूडचा सुपरस्चार सलमान खानचा (Salman Khan) बॉडीगार्ड शेरा (Shera) सगळ्यांनाच माहित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो सलमानची सावली असल्यासारखा त्याच्यासोबत आहे. त्यामुळे शेरा सुद्धा सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. नुकतंच त्याच्याबाबतीत एक माहिती समोर आली आहे. शेराची आई प्रीतम कौर यांच्यासोबत सोसायटीतील एकाने गैरव्यवहार केला आहे. याविरोधात शेराने तक्रार दाखल केली आहे.
शेरा आणि त्याचं कुटुंब अंधेरीच्या मनिष नगरमध्ये ५० वर्षांपासून राहत आहेत. शेराची आई २०२१ पर्यंत सोसायटीच्या अध्यक्षपदावर होती. तर सोसायटीतील जयंतीलाल पटेल हे सदस्य सचिव पदावर होते. दोघांमध्ये एका विषयावरुन भांडण झाले. तेव्हा जयंतीलाल यांनी शेराच्या आईबाबतीत अपमानजनक शब्द वापरले. शेराने एका मुलाखतीत माहिती देताना सांगितले की, 'गेल्या ५० वर्षांपासून आम्ही आशिष को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहत आहोत. इथे माझे आई बाबा आणि माझा मुलगा राहतात आणि मी काही दिवसांपासून ओशिवरा इथे आहे.'
तो पुढे म्हणाला,'२०१६ मध्ये सोसायटीत रिनोव्हेशनचं काम चालू होतं. यासाठी ६० लाखांचं बजेट कमी पडलं. यानंतर आईने २०२१ मध्ये राजीनामा दिला. मात्र तेव्हापासून जयंतीलाल हे चिडलेले आहेत आणि माझ्या आईची बदनामी करत आहेत. त्यांना सर्वांसमोर माझ्या आईबाबत आक्षेपार्ह शब्द उच्चारले. स्वत:ला काय समजते, आता AGM मध्ये बघ मी तुला कसं नागडं करतो ते अशा शब्दात त्याने शिवीगाळ केली. तुम्ही एका ज्येष्ठ महिलेबद्दल असं कसं बोलू शकता? यानंतर आम्ही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.'
शेराच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम 590 आणि 500 अंतर्गत तक्रार नोंद केली आहे.