यावेळी सलमानने त्याचा मित्र इकबालचाही फोटो शेअर केला. त्याने लिहिले की, ‘तारूण्यात हा माझी बॅँक होता. मला अजूनही त्याला २०११ रूपये द्यायचे आहेत. ईश्वराचे आभार की, त्याने त्याचे व्याज घेतले नाही. दरम्यान, सलमान लॉन्च करीत असलेल्या जहीरच्या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत. चित्रपटाची शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहेत. सलमानने केलेल्या ट्विटवरून असे म्हणता येऊ शकेल की, मित्राकडून घेतलेले कर्ज सलमानने त्याच्या मुलाला लॉन्च करून फेडले आहे. दरम्यान, सलमान ‘लवरात्री’ या चित्रपटाच्या माध्यमातून मेहुणा आयुष शर्मा यालाही इंडस्ट्रीत लॉन्च करीत आहे. दरम्यान, जहीरची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाविषयी दिग्दर्शक नितीन कक्कर यांनी सांगितले की, ‘जहीर आपल्या कामाबद्दल खूपच प्रामाणिक आहे. तो खूप पुढे जाईल.’}}}} ">How these kids grow up so soon... ALWAYS keep giving your best #ZAHERO no matter what. Stand tall and always bend backwards for those u love and those who love u, Yeh yaad rakhna that the most important thing in life is Respect and Loyalty. @iamzaheropic.twitter.com/xmn3RXklRk— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 31, 2018
सलमान खानने ‘या’ व्यक्तीकडून घेतले होते २०११ रूपये उधार; मुलाला लॉन्च करून केली परतफेड!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 12:38 PM
बॉलिवूडमध्ये अनेकांना लॉन्च करणारा सुपरस्टार सलमान खान आता जहीर इकबाल याला लॉन्च करण्याची तयारी करीत आहे. यावेळी सलमानने जहीरला ...
बॉलिवूडमध्ये अनेकांना लॉन्च करणारा सुपरस्टार सलमान खान आता जहीर इकबाल याला लॉन्च करण्याची तयारी करीत आहे. यावेळी सलमानने जहीरला सल्ला दिला की, ज्याच्यावर तू प्रेम करतोस आणि जो तुझ्यावर प्रेम करतो त्यांचा नेहमीच सन्मान कर. त्याचबरोबर त्यांच्याप्रती नेहमीच प्रामाणिक राहा. सलमानने बुधवारी आपल्या चाहत्यांसाठी एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये एक मुलगा त्याच्या कडेवर बसलेला दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार, जहीरला कुठल्याही प्रकारची चित्रपट पार्श्वभूमी नाही. फक्त त्याचे वडील सलमानचे लहानपणीचे मित्र आहेत. आता सलमान त्याला काश्मीरमधील लव्ह स्टोरीवर आधारित बनत असलेल्या चित्रपटातून लॉन्च करणार आहे. सलमान खानने गुरुवारी एक ट्विट करीत त्यात लिहिले की, ‘हे मुले इतक्या लवकर मोठे कसे होतात? जहीर काहीही झाले तरी, नेहमीच सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न कर. आपल्या म्हणण्यावर कायम रहा. ज्यांच्यावर तू प्रेम करतो आणि जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांना तू नेहमीच साथ दे. हे नेहमी स्मरणात ठेव की, आयुष्यात सर्वांत मोठी गोष्ट सन्मान आणि प्रामाणिकपणा आहे.’