वरुण धवनची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित 'बेबी जॉन' सिनेमा आज ख्रिसमसच्या मुहुर्तावर सगळीकडे रिलीज झालाय. 'बेबी जॉन'मध्ये वरुण धवन मुख्य अभिनेता म्हणून समोर आलाय. शिवाय सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे सलमान खानची. ट्रेलरमध्ये अवघ्या काही सेकंदासाठी दिसलेला सलमान खान सिनेमात चांगलीच छाप पाडून गेलाय. कशी आहे सलमान खानची एन्ट्री? काय आहे भूमिका? जाणून घ्या.
सलमान खानच्या कॅमिओने जिंकलं प्रेक्षकांचं मन
काही दिवसांपूर्वी आलेल्या 'सिंघम अगेन' सिनेमात सलमानचा कॅमिओ बघून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलेली. परंतु 'बेबी जॉन'मधील सलमानचा कॅमिओ एकदम पैसा वसूल झालाय. सलमानच्या एन्ट्रीलाच प्रेक्षकांनी टाळ्या अन् शिट्ट्या वाजवल्या आहेत. वरुण धवनसोबत सलमानने तगडी मारधाड केली असून गुंडांना लोळवलंय. 'एजंट भाईजान'च्या भूमिकेत सलमानने सर्वांचं पैसा वसूल मनोरंजन केलंय.
सलमानचा कॅमिओ किती मिनिटांचा?
'बेबी जॉन' सिनेमा २ तास ४५ मिनिटांचा आहे. त्यात सलमानचा कॅमिओ ५ ते ७ मिनिटांचा आहे. पण या ५ ते ७ मिनिटांमध्ये सलमानने सर्वांचं चांगलंच मनोरंजन केलंय. अशाप्रकारे 'बेबी जॉन' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. वरुण धवनची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. सिनेमाच्या टीझर, ट्रेलरपासूनच हा सिनेमा प्रेक्षकांच्या वॉचलिस्टवर आहे. 'बेबी जॉन'मध्ये जॅकी श्रॉफ खलनायकाची भूमिका साकारणार आहे.