Join us

OMG! बहिणीसाठी भाईजानने रद्द केला जंगी बर्थ डे पार्टीचा बेत, कारण आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 1:46 PM

उद्या 27 डिसेंबरला सलमानचा वाढदिवस आहे. पण दरवर्षीप्रमाणे यंदा जंगी पार्टीचा बेत रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शर्मासोबत लग्न केले.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा वाढदिवस दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होतो. पनवेलच्या फॉर्महाऊसवर भाईजानच्या वाढदिवसाची जंगी पार्टी रंगते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या पार्टीला हजेरी लावतात. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी हा दिवस खास असतो. उद्या 27 डिसेंबरला सलमानचा वाढदिवस आहे. पण दरवर्षीप्रमाणे यंदा जंगी पार्टीचा बेत रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी सोहेल खानच्या घरी एक छोटे सेलिब्रेशन होणार आहे. कारण काय तर सलमानची बहीण अर्पिता खान. होय, अर्पितासाठी सलमानने त्याची बर्थ डे पार्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्पिता दुसºयांदा प्रेग्नंट आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. उद्या सलमानच्या वाढदिवसीच बाळाला जन्म देण्याचा निर्णय अर्पिता व तिचा पती आशुष शर्मा यांनी घेतला आहे. साहजिकच हा दिवस खान कुटुंबासाठी खास आहे.

सलमानच्या वाढदिवशी खान कुटुंबात नवा पाहुणा येणार म्हटल्यावर साहजिकच खान कुटुंबासाठी हा दिवस खास असणार आहे. अशात सलमान खान बहीणीसोबत राहू इच्छितो. त्यामुळेच पनवेलच्या फार्महाऊसवरची पार्टी त्याने रद्द केली आहे.

18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शर्मासोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे. सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अहिलवर करतो. मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. मामा बनल्यापासून सलमान वेळात वेळ काढून भाचा अहिलसोबत मजा-मस्ती करत असतो. अहिल आणि सलमानच्या मजामस्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल  होतात. आता सलमान पुन्हा एकदा मामा बनणार आहे.

टॅग्स :सलमान खानअर्पिता खान