प्रसिद्ध फिल्ममेकर यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या पत्नी पामेला चोप्रा (Pamela Chopra) यांचं आज निधन झालं. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानेयशराज कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पामेला प्रसिद्ध गायिका होत्या. यशराज फिल्म्समध्ये त्यांनी अनेक गाण्यांना संगीत दिलं. याशिवाय त्यांनी लेखिका, ड्रेस डिझायनर, सहनिर्मात्या म्हणूनही काम पाहिलं. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांचं सांत्वन करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी आणि त्यांच्या घरी पोहोचले होते. याच दरम्यान सलमान खानसुद्धा त्याचा आगामी सिनेमा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan)' चे स्पेशल स्क्रिनिंग आज कॅन्सल केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसा, सलमान खानने त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचे खास सेलिब्रिटींसाठी ठेवलेले स्क्रीनिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खानचे आणि चोप्रा कुटुंबाशी खूप खास नाते आहे. यशराज बॅनरसोबत सलमान खानने 'सुलतान', 'पठाण' आणि 'टायगर सीरिज' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
या चित्रपटाद्वारे सलमान खान ३ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सलमानचे सर्व चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या गाण्यांनी आणि ट्रेलरने आधीच धुमाकूळ घातला आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान'मध्ये सलमान खान, पूजा हेगडे, पूजा हेगडे, व्यंकटेश, भूमिका चावला, शहनाज गिल यांच्याशिवाय, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जगपती बाबू, विजेंदर सिंग, पलक तिवारी आणि जस्सी. 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.