सर्व देशाचं लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे. मराठीसह बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. अभिनेता सलमान खान यानेदेखील कडेकोट बंदोबस्तात मतदानाचा हक्क बजावला आहे.
सलमान खानचा मतदान केंद्रावरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या आसपास पोलिस मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. सकाळपासूनच भाईजान मतदानासाठी कधी येणार याची सर्वजण वाट पाहत होते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सलमान खान आपले अमूल्य मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला. या काळात त्याच्यासोबत कडेकोट बंदोबस्तही पाहायला मिळाला. त्याचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सलमान खानने मुंबईतील माउंट मेरी मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्तात मतदान केले. त्यांचा वाहनांचा ताफा या मतदान केंद्रावर पोहोचला आणि भाईजानने तेथे आपले बहुमोल मतदान केले. सलमान ब्लॅक कॅप, सनग्लासेस, जीन्स आणि टी-शर्ट अशा डॅशिंग लूकमध्ये दिसला. सलमानसाठी कडक बंदोबस्त करण्यात आला होता. कारण, सलमानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. कदाचित सलमान मतदान केंद्रावर येणार नाही, असे मानले जात होते, परंतु तरीही त्याने आपल्या राज्याप्रती असलेले कर्तव्य पार पाडले आहे.