‘या’ चित्रपटात पन्नाशी ओलांडलेला सलमान खान दिसेल १८ वर्षांचा! वाचा, पडद्यामागची बातमी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 4:36 AM
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान याच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाची रिलीजच्या चार आठवड्यानंतरही बॉक्सआॅफिसवर घोडदौड सुरु आहे. ...
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान याच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाची रिलीजच्या चार आठवड्यानंतरही बॉक्सआॅफिसवर घोडदौड सुरु आहे. गतवर्षीच्या सर्व चित्रपटांना मागे टाकत, हा चित्रपट एका पाठोपाठ एक असे कमाईचे विक्रम करत सुटला आहे. ‘टायगर जिंदा है’च्या यशानंतर सलमान खान एका नव्या चित्रपटात बिझी होणार आहे. होय,अतुल अग्निहोत्री निर्मित ‘भारत’ या चित्रपटात सलमान बिझी होणार आहे. सलमानचा हा आगामी चित्रपट अनेकार्थाने खास असणार आहे. कारण या चित्रपटात सलमानला आपण एका खास भूमिकेत पाहू शकणार आहोत. होय, यात १८ वर्षांचा सलमान आपण यात पाहू शकणार आहोत. सध्या सलमान ५२ वर्षांचा आहे. आता रिअल लाईफमध्ये पन्नासी ओलांडलेल्या सलमानला १८ वर्षांचे कसे दाखवणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यासाठी एका खास तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. होय, ऐज रिडक्शन टेक्निक यासाठी वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. आता यंग दिसायचे तर वजनही कमी करणे आलेच. त्यानुसार, पुढच्या काही आठवड्यात सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. म्हणजेच सलमानला पुन्हा एकदा जिममध्ये घाम गाळावा लागून कडक डाएट फॉलो करावे लागेल.ALSO READ : सलमान खान, शिल्पा शेट्टी हाजिर हो! राजस्थान पोलिसांनी बजावला समन्स!!या शूटींगची पूर्वतयारी सध्या सुरु आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल. अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने हा चित्रपट रखडत चालला होता. सर्वप्रथम हा चित्रपट राजकुमार संतोषी यांनीच दिग्दर्शित करावा, असे अतुल व सलमानला वाटत होते. पण संतोषींनी सलमानला बरीच प्रतीक्षा करवली. अखेर सलमाननेच आपली वाट बदलवून हा प्रोजेक्ट त्याचा आवडता दिग्दर्शक अली अब्बास जफरकडे सोपवला. सलमानचा सुपरडुपर हिट ‘सुल्तान’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे दोन्ही चित्रपटही अली अब्बास जफरने दिग्दर्शित केले आहेत.