भाईजान सलमान खानची बातचं न्यारी. सध्या सल्लू मध्यप्रदेशातील मंडलेश्वर येथे ‘दबंग 3’चे शूटींग करतोय. साहजिकचं मंडलेश्वर येथील चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. ‘दबंग 3’च्या सेटवरचे फोटो व्हायरल करण्यापासून तर सल्लूच्या पाठीमागे धावत सुटण्यापर्यंतचे ना-ना करामती करण्यात चाहते बिझी आहेत. विश्वास बसत नसेल तर हा ताजा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. सलमान सायकल घेऊन रस्त्यांवर फिरतोय आणि त्याच्यामागे चाहत्यांची अख्खी फौज त्याच्यामागे धावत सुटलीय, असा हा व्हिडीओ सध्या जाम चर्चेत आहे. कुणी त्याचा फोटो कॅमेºयात कैद करण्याचा प्रयत्न करतोय तर कुणी नुसतेच त्याच्या पाठीशी धावत आहेत.
Video Viral : सायकलवर सल्लूला पाहून चाहत्यांना लागलं याडं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 11:51 IST
भाईजान सलमान खानची बातचं न्यारी. सध्या सल्लू मध्यप्रदेशातील मंडलेश्वर येथे ‘दबंग 3’चे शूटींग करतोय. साहजिकचं मंडलेश्वर येथील चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
Video Viral : सायकलवर सल्लूला पाहून चाहत्यांना लागलं याडं!
ठळक मुद्दे ‘भारत’ हातावेगळा केल्यावर सलमानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले. ‘दबंग 3’ पूर्ण होताच सलमान ‘इंशाअल्लाह’ या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात बिझी होणार आहे.