Join us

सलमान खान विसरला नाही ‘भारत’चा एपिसोड! प्रियंका चोप्रासोबत काम करण्यास दिला नकार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 14:17 IST

ताजी बातमी खरी मानाल तर, प्रियंकासोबत काम करण्यात सलमानला जराही रस उरलेला नाही. याचे कारण काय तर ‘भारत’चा गाजलेला एपिसोड.

ठळक मुद्देहोय, ‘भारत’ या चित्रपटातून प्रियंकाने ऐनवेळी अंग काढून घेतले होते. शूटींग पाच दिवसांवर आले असताना प्रियंकाने या चित्रपटासाठी नकार दिला होता.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची जोडी तब्बल १२ वर्षांनंतर एकत्र काम करतेय. यापूर्वी ‘सांवरिया’ या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली होती. अर्थात या चित्रपटात सलमान खान केवळ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. पण आता भन्साळींच्या आगामी चित्रपटात सलमान लीड रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या फिमेल लीडबद्दल सांगायचे तर हिरोईनचा शोध अद्यापही सुरु आहे. मध्यंतरी भन्साळींच्या या चित्रपटात सलमानसोबत प्रियंका चोप्राची वर्णी लागणार, अशी चर्चा होती. खुद्द प्रियंकाने ‘कॉफी विद करण 6’मध्ये बोलताना याचे संकेत दिले होते. पण आता ताजी बातमी खरी मानाल तर, प्रियंकासोबत काम करण्यात सलमानला जराही रस उरलेला नाही. याचे कारण काय तर ‘भारत’चा गाजलेला एपिसोड.

होय, ‘भारत’ या चित्रपटातून प्रियंकाने ऐनवेळी अंग काढून घेतले होते. शूटींग पाच दिवसांवर आले असताना प्रियंकाने या चित्रपटासाठी नकार दिला होता. यासाठी देसी गर्लने लग्नाचे कारण दिले होते. लग्न करणार असल्याने मी चित्रपटाला वेळ देऊ शकत नाही, अशी तिची सबब होती. इतक्या ऐनवेळी प्रियंकाने नकार दिल्याने ‘भारत’च्या अख्ख्या टीमला धक्का बसला होता. प्रियंकाच्या नकारानंतर मेकर्सला घाईघाईत कॅटरिना कैफला साईन करावे लागले होते. साहजिकचं प्रियंकाच्या या अडेलतट्टू वागण्याने भाईजान कमालीचा संतापला होता. भाईजान अद्यापही हा अख्खा एपिसोड विसरलेला नाही. त्याचमुळे प्रियंकासोबत पुन्हा काम करण्याची त्याची इच्छा नाही. अर्थात देसी गर्लला मात्र कुठल्याही स्थितीत भन्साळींचा सिनेमा सोडायचा नाही. त्यामुळे देसी गर्ल भाईजानची समजूत काढते की भन्साळींचा सिनेमा हातचा गमावते, ते बघूच.

टॅग्स :सलमान खानप्रियंका चोप्रा