Join us  

Sikandar First Look : 'सिकंदर'मधील सलमान खानचा दमदार लूक पाहिलात का? भाईजानला पाहून चाहते क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 3:00 PM

सलमानने स्वतः सेटवरील पहिला फोटो शेअर केला आहे.

सलमान खान आणि ईद हे समीकरण ठरलेलं. गेल्या अनेक वर्षांपासून भाईजान ईदच्या दिवशी त्याचे सिनेमे रिलीज करतोय. सलमानचा  'सिकंदर' हा सिनेमादेखील ईद २०२५ ला रिलीज होणार आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाशी संबंधित नवीन अपडेट्स समोर येत आहेत.  आता यातच सलमानचा सिनेमातील लूक समोर आला आहे. भाईजानचा हा लूक पाहून चाहते तर क्रेझी झालेत. 

सिकंदरच्या शूटिंगचा श्री गणेशा झाला. सलमानने स्वतः सेटवरील पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भाईजान एका नव्या लूकमध्ये असून  खूपच डॅशिंग दिसत आहे.  कॅप्शनमध्ये सलमानने लिहलं, 'सिकंदरच्या टीमसोबत पुढच्या वर्षी ईदची वाट पाहतोय'. सलमान खानचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांची उत्कंठा तर गगनाला भिडली असून प्रत्येकजण या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. या फोटोत  सलमान हा चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक एआर मुरुगादाससोबत दिसून येत आहे.

सिकंदर सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचीदेखील एन्ट्री झाली. सिकंदरच्या माध्यमातून चाहत्यांना सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची फ्रेश जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. रश्मिका स्वतः सलमानसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहे.  शिवाय, बाहुबलीमध्ये कटप्पाची भूमिका साकारणारा अभिनेता सत्यराज  सिकंदर सिनेमात खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. सिकंदर हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट असल्याचे बोलले जात आहे.

साजिद आणि सलमानचे सिकंदर या चित्रपटाच्या आधी देखील एकत्र काम केले आहे. जुड़वा, मुझसे शादी करोगी, किक या साजिद आणि सलमान यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ए.आर. मुरुगदास हे त्यांच्या गजनी, हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यांचा सिकंदर हा चित्रपट देखील हिट होणार का? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमासोशल मीडिया