अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर एक स्पेशल आणि इमोशनल पोस्ट लिहिली आहे. जी सध्या तुफान व्हायरल होत आहे. दबंग खानने ही पोस्ट त्याची लाडकी भाची अलीजेह अग्निहोत्रीसाठी लिहिली आहे. या पोस्टमध्ये सलमानचं अलीजेहसोबतचं खास बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत आहे. यासोबतच सलमानने अलीजेहला तिच्या वाढदिवसानिमित्त मोलाचा सल्लाही दिला आहे. अलीजेह ही सलमानची बहीण अलवीरा आणि अभिनेता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.
सलमानने अलीजेह अग्निहोत्रीचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमानने अलजेहला प्रेमाने उचलून घेतलेलं दिसत आहे. दोघंही एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहेत. या क्यूट फोटोसह सलमानने भाचीला तिच्या 22 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक खास पोस्ट लिहून सल्लाही दिला.
"मामू वर एक उपकार कर.."
दबंग खानने या पोस्टमध्ये "मामूवर एक उपकार कर. जे काही करशील ते मनापासून आणि मेहनतीने कर. हेच नेहमी लक्षात ठेव. आयुष्यात सरळ जा आणि उजवीकडे वळा. फिट होण्याच्या नादात एकसारखी होऊ नकोस आणि वेगळं होण्याच्या नादात सर्वात वेगळी होऊ नकोस. सर्वात महत्त्वाची गोष्ट... एकदा कमिटमेंट केलीस तर मामाचं देखील ऐकू नकोस."
सलमानच्या या पोस्टनंतर अलीजेहच्या चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. अवनीश बडजात्याच्या पहिल्या चित्रपटातून अलीजेह बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. अवनीश हा चित्रपट निर्माता सूरज बडजात्या यांचा मुलगा आहे. मात्र, नंतर हे वृत्त खोटं ठरलं. यानंतर अशा बातम्या आल्या की सोमेंद्र पाढीने अलीजेहला त्याच्या पुढच्या चित्रपटात कास्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.