Join us

Bigg Boss OTT 2 : भाईजानचा भूतकाळ येणार समोर; सलमानची एक्स गर्लफ्रेंड होणार सहभागी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 11:54 AM

Bigg boss ott 2:आतापर्यंत सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यामुळे सलमानची नेमकी कोणती एक्स गर्लफ्रेंड यात सहभागी होणार हा प्रश्न आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. या कार्यक्रमाने छोटा पडद्या गाजवल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मदेखील गाजवला. बिग बॉस ओटीटीचं पहिलं पर्व चांगलंच गाजलं. त्यानंतर आता बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीजन (Bigg Boss OTT 2) नुकताच सुरु झाला आहे. हा सीजन सुरु होण्यापूर्वीच त्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. या पर्वाचं सूत्रसंचालन सलमान खान करणार असून हे पर्व त्याच्यासाठी खास असल्याचं म्हटलं जात आहे.

बिग बॉस ओटीटी २ ची घोषणा झाल्यापासून या पर्वाविषयी विविध चर्चा रंगल्या आहेत.  या घरात आता कसे वाद रंगणार, टास्क काय असतील हे जाणून घेण्याची प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. यामध्येच या पर्वात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, आतापर्यंत सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यामुळे सलमानची नेमकी कोणती एक्सगर्लफ्रेंड यात सहभागी होणार हा प्रश्न आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संगिता बिजलानी,जरीन खान, डेजी शाह आणि  स्नेहा उल्लाल यांच्यापैकी एक जण या शोमध्ये सहभागी होणार आहे. मात्र, या चौघींपैकी नेमकी कोणती अभिनेत्री बिग बॉस ओटीटी २ मध्ये जाणार हे मात्र निश्चित नाही. परंतु, या चौघींपैकी संगिता बिजलानीचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

दरम्यान, मैंने प्यार किया फेम भाग्यश्रीदेखील या पर्वात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. बिग बॉस ओटीटी शनिवारी (१७ जून) सुरु झालं आहे. आतापर्यंत या शोच्या सुरुवातीला आलिया सिद्दीकी, आकांक्षा पुरी, अविनाश सचदेव, फलक नाज, जिया शंकर, बेबिका धुर्वे, मनिषा रानी, पलक पुरसवानी आणि दुबईतील मॉडल आणि अभिनेता सहभागी झाले आहेत.

टॅग्स :बिग बॉससलमान खानसेलिब्रिटीटेलिव्हिजन