मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे फॅन्स जगभरात आहे. सध्या ती सलमान खानच्या दबंग टूर दौऱ्यावर आहे. या टूरवर तिच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा आणि गुरू रंधावा हेही आहे. या टूरदरम्यान कतरिना कैफसोबत एका फॅन्सने गैरवर्तन केले.
झाले असे की, कतरिना कैफ कॅनडा येथील शो संपवून परत हॉटेलला जात होती. त्यावेळी काही फॅन्सनी तिला घेरले आणि तिला सेल्फी काढण्यासाठी विचारले.
कतरिना शो केल्यानंतर थकली होती. त्यामुळे तिने फॅन्सना विनंती केली की, तिला काहीवेळ आराम करायचा आहे. पण फॅन्सनी तिच्या कमेंट करायला सुरुवात केली. अशात काही चि़डलेल्या फॅन्सनी तिला म्हटले की, आम्हाला तुझ्यासोबत फोटो काढयचा नाहीये.
फॅन्सच्या या वागण्यामुळे कतरिना चांगलीच निराश झाली होती. पण तरीही तिने काही फॅन्ससोबत सेल्फी काढलेत. कतरिनासोबत ही घटना कॅनडाच्या वेंकूवर शहरात घडली.