Join us

बाबो ! सलमान खानच्या 'या' जॅकेटची किंमत वाचून सुटेल तुम्हाला घाम

By गीतांजली | Updated: October 7, 2020 16:42 IST

अभिनेता सलमान खानने सहा महिन्यानंतर आगामी सिनेमा  'राधे'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

अभिनेता सलमान खानने सहा महिन्यानंतर आगामी सिनेमा  'राधे'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अलीकडेच सलमानने सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली होती. या फोटोत सलमान खान बॅक पोजमध्ये बाईक रायडरच्या लूकमध्ये दिसतोय. 

या फोटोत सलमान खानने काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. त्याची सध्या खूप चर्चा होते आहे. आता  भाईजानने हे जॅकेट घातले आहे, तेव्हा हे स्पष्ट आहे की हे सामान्य जॉकेट नसणार. लोक त्याच्या जॅकेटची कंपनी आणि किंमतीचा अंदाज लावत होते. जागरणच्या रिपोर्टनुसार हे जॅकेट  'डस्ट ऑफ गॉड' कंपनीचे आहे. रिपोर्टनुसार सलमानने घातलेले हे जॅकेट 1 लाख 28 हजारांचे आहे. तुम्हाला हे जॅकेट हवे असेल तर एवढी किंमत मोजावी लागणार आहे. या ब्रॅण्डच्या जॅकेट्स बर्‍याच वेळा शाहरुख खान, विक्की कौशलने परिधान केलेले दिसले आहे.

राधेची शूटिंग एनडी स्टुडिओमध्ये सुरु आहे, त्यानंतर 15 दिवसांचे पॅचवर्क महबूब स्टुडिओमध्ये होणार आहे. सेटवर विशेष काळजी घेण्यात येते आहे. ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा प्रभुदेवा दिग्दर्शित करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

टॅग्स :सलमान खान