आपल्या आवडत्या कलाकारासह फोटो काढावा, सेल्फी काढावा किंवा ऑटोग्राफ मिळावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. त्या क्षणासाठी रसिक काहीही करायला तयार असतात. त्यामुळे कलाकारांनाही आपली रसिकांमध्ये असलेली लोकप्रियता कळून येते. त्यामुळे कलाकार मंडळी यासाठी मोठ्या आनंदाने तयार होतात. मात्र कधी कधी अतिउत्साही चाहत्यांमुळे काही कलाकार यासाठी नकारही देतात. नुकताच असाच एक प्रकार सलमान खान सोबतही घडला.
सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते तसेही उत्सुक असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत सेल्फी, फोटो काढण्याची अनेकांची इच्छा असते. अशाच सेल्फीसाठी एक तरुण सलमान खानच्या बाजुला आला. त्यावेळी तिथं गर्दीही झाली होती. तरुण सेल्फी काढण्यासाठी आटापिट करत होता. मात्र काही केला चाहत्याला हवा तसा फोटो येत नसावा. म्हणून त्याचे सेल्फी काढणे सुरुच होते. मात्र याच दरम्यान मीडियाचे कॅमरेही तिथे होते. त्यामुळे सलमान मीडियाला फोटो देण्यात बिझी होती. मात्र या तरुणामुळे मीडियालाही सलमान खानचे फोटो काढणे शक्य होत नव्हते. तो सारखा मध्ये मध्ये येत असल्यामुळे सलमानही वैतागला. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओत चाहत्याचा फोटो घेण्यासाठी आटापिटा आणि सलमानचं वैतागणं पाहून चाहतेही कमेंट्स करत आपले विचार मांडत आहेत.
गेल्या वर्षीसुद्धा असाच प्रकार समोर आला होता. एअरपोर्टवर चाहत्याने सलमानसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सलमान अतिशय भडकला होता. त्याचा फोनच सलमानने हिसकावून घेतला होता. तो व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता. आजचा हा प्रकार पाहून चाहत्यांनी पुन्हा एकदा त्याच किस्स्याची आठवण करुन दिल्याचे पाहायला मिळत आहे.