Join us

म्हणून सलमान आहे सर्वांचा भाईजान, कामाशिवायच देतोय सर्वांना पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 8:11 PM

सध्या सलमानच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होतंय.

लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाचं जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम देशातल्या रोजंदारी कामगारांवर जास्त पडला आहे. सिनेसृष्टीतीस चित्रीकरण बंद झाले असल्याने इंडस्ट्रीतील अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थिती सलमान खान पुन्हा एकदा आपला मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान त्याचा आगामी सिनेमा राधेच्या शूटिंग शिवायच क्रू मेबर्सना त्यांचा महिन्याचा पगार दिला आहे. याआधी ही सलमाने  २५ हजार कामगारांची मदत केली आहे.

 राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार, सलमान खानचा आगामी सिनेमा राधेची शूटिंग 26 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत होणार होती मात्र कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आणि शूटिंग थांबली. या परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेत सलमानने आपल्या क्रू मेंबर्सच्या खात्यात पैसे जमा केला. सलमान खानचा हा दानशूरपणा बघून त्याचे चाहते पुन्हा एकदा त्याची स्तुती करतायेत. अजूनपर्यंत सलमानच्या टीमकडून याची अधिकारी घोषणा झालेली नाही.  

राधेमध्ये सलमान नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान खान आणि प्रभूदेवा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे.सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. 'राधे' चित्रपट २०२०मध्ये ईदच्या वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :सलमान खानकोरोना वायरस बातम्या