Join us

विवेक ऑबरॉयच्या पीएम-नरेंद्र मोदी या चित्रपटासोबत सलमान खानचे आहे हे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 5:47 PM

संदीप एससिंग यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर आणखीन एक चर्चा रंगली आहे. विवेकच्या ‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटासोबत आता सलमान खानचे देखील कलेक्शन असल्याचे या ट्वीटवरून सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देदस या चित्रपटातील सुनो गौर से दुनिया वालो हे गाणे सलमान खान आणि संजय दत्त यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. त्यामुळेच या गाण्यावरून सलमानचे या चित्रपटाशी कनेक्शन असल्याचे म्हटले जात आहे. 

पीएम-नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर आपले नाव पाहून गीतकार जावेद अख्तर यांना चांगलाच धक्का बसला होता. या चित्रपटाचे पोस्टर ट्वीट करून त्यांनी त्यासोबत लिहिले होते की, या पोस्टरवर माझे नाव पाहून मला धक्काच बसला... कारण या चित्रपटातील कोणतीच गाणी मी लिहिलेली नाहीत. 

 

जावेद अख्तर यांनी हे ट्वीट केल्यानंतर ‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे निर्माते संदीप एससिंग यांनी ट्वीट करून याबाबत खुलासा केला होता की, आम्ही या चित्रपटात 1947ः अर्थ या चित्रपटातील ईश्वर अल्ला आणि दस या चित्रपटातील सुनो गौर से हे गाणे घेतले आहे. त्याचमुळे या गाण्याचे गीतकार जावेद अख्तर आणि समीर यांची नावे या पोस्टरमध्ये टाकण्यात आली आहेत. 

संदीप एससिंग यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर आणखीन एक चर्चा रंगली आहे. विवेकच्या ‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटासोबत आता सलमान खानचे देखील कलेक्शन असल्याचे या ट्वीटवरून सिद्ध झाले आहे. दस या चित्रपटातील सुनो गौर से दुनिया वालो हे गाणे सलमान खान आणि संजय दत्त यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. त्यामुळेच या गाण्यावरून सलमानचे या चित्रपटाशी कनेक्शन असल्याचे म्हटले जात आहे. 

सलमान खान आणि विवेक ऑबेरॉय यांच्यात असलेले भांडण सगळ्यांनाच माहीत आहे. सलमान खान आणि विवेक यांच्यामध्ये ऐश्वर्या रायमुळे कटुता निर्माण झाली. आज या गोष्टीला अनेक वर्षं झाली असली तरी सलमानने विवेकला माफ केलेले नाही. 

येत्या ५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात २०१४ मधील निवडणुका ते पंतप्रधानपदापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास दाखवला जाणार आहे. मेरी कोम आणि सरबजीत चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात विविध दमदार राजकीय व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत. अभिनेता मनोज जोशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भूमिका साकारणार आहेत. हिराबेन म्हणजेच मोदींच्या आईची भूमिका अभिनेत्री जरीना वहाब साकारणार आहे तर किशोरी शहाणे इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री बरखा बिष्ट ही मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे.

टॅग्स :सलमान खानविवेक ऑबेरॉयपी. एम. नरेंद्र मोदी