Join us  

स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 10:24 AM

Pratiek Babbar : अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या 'सिकंदर' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. 'बाहुबली' सिनेमातील कटप्पा म्हणजेच सत्यराज आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील या चित्रपटात दिसणार आहेत. अभिनेता प्रतिक बब्बरही 'सिकंदर'चा एक भाग आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या 'सिकंदर' (Sikandar) या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. 'बाहुबली' सिनेमातील कटप्पा म्हणजेच सत्यराज (Satyaraj) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) देखील या चित्रपटात दिसणार आहेत. अभिनेता प्रतिक बब्बर(Pratiek Babbar)ही 'सिकंदर'चा एक भाग आहे. या चित्रपटात तो एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे, ज्याबद्दल प्रतिक उत्सुक आहे. प्रतिक बब्बरने अलिकडेच सलमानसोबत 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला आणि अभिनेता त्याच्या करिअरला पाठिंबा देत असल्याचे सांगितले.

प्रतिक बब्बरने 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो सलमान खानसोबत काम करण्यासाठी नर्व्हस होता, पण या अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने तो स्वत:ला नशीबवान समजतो. प्रतिक म्हणाला की, सलमान त्याच्या करिअरला मदत करतो आहे. प्रतिक बब्बरला जेव्हा 'सिकंदर'मधील भूमिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'आता मी याबद्दल सांगू शकत नाही, पण 'सिकंदर'मध्ये मी नकारात्मक भूमिका करत आहे. चित्रपटातील सर्व नकारात्मक मुख्य पात्रांपैकी मी एक आहे. अलिकडेच आम्ही एक अतिशय इंटेन्स प्लेन सीक्वेन्स शूट केला. मी खूप नर्व्हस झालो होतो आणि घाबरलो होतो. मी त्यांच्याकडे टक लावून पाहत होतो. शेवटी तो मेगास्टार सलमान खान आहे.

सलमानसोबत ॲक्शन सीन झाला शूट काही महिन्यांपूर्वीच प्रतिक बब्बर आणि सलमान खानने एक दमदार ॲक्शन सीन शूट केला होता. विमानात त्याचे चित्रीकरण करण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि प्रतिक यांच्यातील हा ॲक्शन सीन वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे शूट करण्यात आला होता. या ॲक्शन सीनचा एक विमान देखील भाग होता. या सीनसाठी खास सेट तयार करण्यात आला होता.

'सिकंदर' २०२५च्या ईदला होणार रिलीज या चित्रपटात सलमान खान सिकंदरची भूमिका साकारणार असून तो २०२५ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर, एआर मुरुगादास यांनी दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :प्रतीक बब्बरसलमान खान