Join us

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणार सलमान खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:41 IST

कोरोनामुळे अनेक मुलं अनाथ झाली आहेत. आता एका मुलाच्या मदतीसाठी सलमान खान पुढे आला आहे. 

ठळक मुद्देसलमानने कर्नाटक मधील एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याला मदत केली आहे. त्या मुलाच्या वडिलांचे करोनामुळे नुकतेच निधन झाले.

कोरोनाने भारतात थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनामुळे अनेक मुलं अनाथ झाली आहेत. आता एका मुलाच्या मदतीसाठी सलमान खान पुढे आला आहे. 

सलमानने कर्नाटक मधील एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याला मदत केली आहे. त्या मुलाच्या वडिलांचे करोनामुळे नुकतेच निधन झाले.

सलमान आणि राहुल एस. कानल मिळून सध्या कोरोना काळात अनेकांना मदत करत आहेत. त्यांनीच मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, “कर्नाटकमध्ये राहाणाऱ्या एका मुलाच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाल्यानंतर सलमानने या मुलाच्या खाण्यापिण्याची आणि शैक्षणिक वस्तूंची संपूर्ण व्यवस्था केली. या विद्यार्थ्याला मदतीची गरज असेल तेव्हा सलमान नेहमीच मदत करेल.

सलमानची बिइंग ह्युमन ही संस्था गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सची मदत करत आहे. बिइंग हंग्री या नावाने सलमानच्या स्वयंसेवी संस्थेचा एक फूड ट्रक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना खाण्याचे पदार्थ, चहा, पिण्याचं पाणी पुरवण्याची सेवा देत आहे. मुंबईत वांद्रे ते जुहू आणि वांद्रे ते वरळी या भागात ही गाडी अनेकवेळा फिरताना दिसून येते. सलमान खान आणि राहुल कनाल हे दोघे मिळून पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कसना मदत करत असून संध्याकाळी पाच ते रात्री दहा या वेळात ही गाडी फिरत असते.

टॅग्स :सलमान खान