बॉलिवूड अभिनेता सलमान खान(Salman Khan)च्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अनुज थापन याने बुधवारी आत्महत्या केली. अनुज थापनच्या कुटुंबीयांनी आता मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली आहे. ही आत्महत्या नसून या मृत्यूमागे कट असल्याचा आरोप आरोपीचे कुटुंबीय आणि वकिलांनी केला असून, त्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी. अनुजच्या कुटुंबीयांचे वकील रजनी खत्री यांनी सांगितले की, अनुजच्या आईच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य, गुन्हे शाखा आणि सलमान खान या तिघांचा समावेश केला आहे.
वकिलांनी सांगितले की, रिट याचिकेत अभिनेता सलमान खानविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणीही करण्यात आली असून अनुजच्या आत्महत्येची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या घटनेत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनुजला थर्ड डिग्री टॉर्चर देण्यात आले. ही आत्महत्या नसून पोलीस कोठडीतील खुनाचे प्रकरण आहे. या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेचे अधिकारी छोटा शकीलसह मकोकामध्ये सहआरोपी असल्याचा आरोप वकिलाने केला आहे. अशा स्थितीत गुन्हे शाखेच्या निष्पक्ष तपासावर विश्वास ठेवता येणार नाही.
कुटुंबीयांचा अनुजची हत्या केल्याचा संशय दक्षिण मुंबईतील पोलिस आयुक्तालय संकुलातील क्राइम ब्रँचच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बांधलेल्या लॉकअप टॉयलेटमध्ये आरोपी अनुजने गळफास लावून घेतला होता. अनुजवर १४ एप्रिल रोजी मुंबईतील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप होता. त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. अनुजचा लॉकअपमध्ये मृत्यू झाल्यामुळे आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपीचे वकील अमित मिश्रा आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनीही अशा सुरक्षित लॉकअपमध्ये आरोपीच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखलअनुजच्या कुटुंबीयांनाही त्याच्या आत्महत्यावर संशय आहे. पोलिस कोठडीत हा खून झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या मृत्यूमागे कट असल्याचा संशय कुटुंबीय व्यक्त करत आहेत. कुटुंबीयांना या प्रकरणाचा सीबीआय तपास हवा आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.