बॉलिवूडमधील अफेअर्स, किस्से हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. काही सेलिब्रिटी एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. तर काही जण कट्टर वैरी आहेत. काही कारणांमुळे अनेक सेलिब्रिटी पार्टीदरम्यानही एकत्र दिसत नाहीत. यापैकीच एक म्हणजे सलमान खान आणि अभिषेक बच्चन. पण, नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटदरम्यान सलमान आणि अभिषेक एकमेकांना मिठी मारताना दिसून आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.
चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि सलमान खानही या पार्टीत उपस्थित होते. या पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सलमान खान आधी अमिताभ बच्चन यांना हात मिळवून त्यांची भेट घेताना दिसत आहे. त्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या अभिषेक बच्चनला त्याने पाहिलं. आणि त्याला मिठी मारली.
अभिषेक-सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 'विरल भय्यानी' या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यां कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट करत "ऐश्वर्या आला असती तर मस्त वाटलं असतं," असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "आता तर सगळं ठीकच होणार...ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट होत आहे," असं म्हटलं आहे. "अभिषेक आणि सलमानला पहिल्यांदाच मी असं मिठी मारताना बघत आहे," अशी कमेंट केली आहे.
सलमान आणि ऐश्वर्या काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण, काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर ऐश्वर्याने २००७मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न करत संसार थाटला. त्यांना आराध्या ही मुलगी आहे.