Join us  

Salman Khan In Pathaan: शाहरुखच्या ‘पठाण’मध्ये कॅमिओ करण्यासाठी सलमान खानने कितनी फीस घेतली..?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 7:58 PM

Salman Khan In Pathaan: सध्या देशभरात शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाची चर्चा होत आहे.

Salman Khan Pathaan Movie Fees: सध्या देशभरात सर्वत्र शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाची चर्चा होत आहे. यशराज बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. विशेष म्हणजे, सलमान खान या चित्रपटात कॅमिओ करणार आहे. यासाठी सलमानने किती फीस आकारली आहे...?

सलमान खान आणि शाहरुख खान यांची मैत्री कोणापासून लपलेली नाही. काही वर्षांपूर्वी एका पार्टीत झालेल्या वादामुळे या दोन्ही स्टार्समध्ये बराच काळ संभाषण झाले नव्हते, मात्र संवाद सुरू झाला तेव्हा दोघांमधील मैत्री आणखीनच घट्ट झाली. याचा पुरावा चाहत्यांनी अनेक प्रसंगी पाहिला आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली तेव्हाही सलमान थेट शाहरुखच्या घरी गेला होता.

सलमानने किती पैसे घेतले?इतकी घट्ट मैत्री असेल तर या दोघांमधे पैसा कसा येणार. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने शाहरुखच्या चित्रपटात कॅमिओ करण्यासाठी पैसे घेण्यास नकार दिला होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात यशराज स्टुडिओमध्ये सलमानने त्याच्या सीन्सची शुटिंग केली होती. दरम्यान, शाहरुख खानने पठाणची फी म्हणून जवळपास 100 कोटी रुपये घेतल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे बजेट 250 कोटी आहे.

चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार पठाणमध्ये शाहरुख खान पुन्हा एकदा सिक्स पॅक अॅब्ससह मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्याची झलक बेशरम रंग या गाण्यातही दिसून आली आहे. इतकंच नाही तर प्रेक्षकांना दमदार अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहेत. जॉन अब्राहमसारख्या अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत असल्यामुळे चित्रपट आणखीनच रंगतदार झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद असून, त्याने यापूर्वी टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनचा अॅक्शनपट वॉर दिग्दर्शित केला होता. पठाण 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानसलमान खानदीपिका पादुकोण