Join us

आशिष शेलार यांच्या भेटीला गेलेल्या सलमानने घातला फाटका टी शर्ट; नेटकरी म्हणाले, 'आम्ही घातला तर..;

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 10:52 IST

Salman khan: सलमान खान आशिष शेलार यांच्या भेटीला गेला असताना त्याने फाटका टी शर्ट परिधान केला होता.

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान कायमच त्याच्या स्टारडमसाठी ओळखला जातो. सलमान कुठेही केला की त्याच्याभोवती चाहत्यांचा गरडा होता. सलमान त्याच्या स्टारडमसोबतच साध्या राहणीमानामुळेही चर्चेत येत असतो. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या या मेगास्टारचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो चक्क फाटका टी शर्ट घालून फिरत असल्याचं नेटकऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे. ज्यामुळे युजर्सने त्याच्या फोटोवर कमेंट करायला सुरुवात केली आहे.

विरल भय्यानी यांना त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर सलमानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमानने चक्क फाटका टी शर्ट परिधान केल्याचं दिसून येत आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यावर काहींनी त्याच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी खिल्लीही उडवली आहे.

काही दिवसांपूर्वी सलमान त्याच्या वडिलांसोबत आशिष शेलार यांच्या भेटीला गेला होता. यावेळीचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. परंतु, यावेळी त्याने घातलेल्या टी शर्ट फाटला होता. हा टी शर्ट पाहून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली.

दरम्यान, भाईजानने असे कपडे घातले तर सिंपलसिटी आणि गरीब माणसाने घातले तर कंजूसपणा,असं एका युजरने म्हटलं आहे.  तर, काहींनी त्याची खिल्ली उडवत त्याने मुद्दाम असं केल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :सलमान खानआशीष शेलारसलीम खानसेलिब्रिटीबॉलिवूड