बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान (Salman Khan)आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. त्याच्या लव्ह लाईफची चर्चाही होताना दिसते. सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. अर्थात त्याचं एकही नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलेलं नाही. आता एक ताजी बातमी आहे. पुन्हा एकदा सलमानच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. भाईजानला नवी पार्टनर मिळाल्याचं म्हटलं जात आहे. होय, सलमान स्वत:पेक्षा 24 वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे. ही अभिनेत्री कोण? तर तिचं नाव पूजा हेगडे.
पूजा हेगडे (Pooja Hegde) सध्या तिच्या ‘सर्कस’ (Cirkus) या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण याचदरम्यान अचानक पूजा व सलमानच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ट्रेड अॅनालिस्ट उमैर संधू याच्या एका ट्विटने संपूर्ण बॉलिवूड व सिनेप्रेमींना हैराण केलं आहे. सलमान व पूजा हेगडे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा त्याने ट्विटमध्ये केला आहे.
‘ब्रेकिंग न्यूज...टॉऊनमध्ये नवं कपल आलं आहे. मेगास्टार सलमान खानला पूजा हेगडेशी प्रेम झालं आहे. सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसने पूजाला पुढच्या 2 सिनेमांसाठी साईन केलं आहे. हे दोघं सध्या एकमेकांसोबत बराच वेळ घालवत आहेत. सलमानच्या जवळच्या सूत्रांनी ही गोष्ट कन्फर्म केली आहे,’ अशा आशयाचं ट्विट उमैर संधूने केलं आहे.आता या ट्विटमध्ये किती सत्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण सध्या अफवांचा बाजार गरम आहे.
हे तर नाही अफवेचं कारण?सलमानचा ‘किसी का भाई किसी का जान’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या सिनेमात सलमानसोबत पूजा हेगडे लीड रोलमध्ये आहे. कदाचित या आगामी सिनेमामुळे सलमान व पूजाच्या अफेअरच्या अफवेला जन्म देण्यात आलं आहे. आता खरं काय? हे लवकर कळेलच.
पूजा हेगडे गेल्या 10 वर्षांपासून सिनेसृष्टीत आहे. या दशकभरातील कारकीर्दीत तामिळ, तेलुगूमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे तिने केले आहेत. हिंदीत मात्र केवळ चार सिनेमात ती झळकली. आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमात ऋतिकसारखा हिरो आणि आशुतोष गोवारीकरसारखां दिग्दर्शक तिला लाभला. पण तरीही ती बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी चमकदार कामगिरी दाखवू शकली नाही. पण आता हिंदीमध्येही तिची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली आहे. तिला मोठमोठ्या बॅनर्सचे सिनेमे मिळू लागले आहेत.