बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने अलिकडेच बिग बॉस १५ च्या (Bigg Boss 15) स्पर्धकांसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये बिग बॉस १५ मध्ये सहभागी झालेले सगळे स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी विशाल कोटियन (Vishal Kotian) याची गर्लफ्रेंड पायल शेट्टीदेखील (Payal Shetty) या पार्टीत आल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या पार्टीत सलमानने पायलला पाहताच तिला किस केलं. हे पाहून विशाल चांगलाच नाराज झाल्याचं दिसून आलं. विशालने सोशल मीडियावर एका पोस्टवर कमेंट करत त्याची नाराजी व्यक्त केली आहे.
अलिकडेच विशालच्या गर्लफ्रेंडने पायलने इन्स्टाग्रामवर या पार्टीतील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने 'ओम शांती ओम' चित्रपटातील 'आई ऐसी रात है जो बहुत खुशनसीब है। चाहे जिसे दूर से दुनिया, वो मेरे करीब है। ही गाण्याची ओळ कॅप्शनमध्ये लिहिली होती. तसंच या फोटोत सलमान पायलच्या गालावर किस करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यावर विशालने त्यावर कमेंट केली आहे. त्याची ही कमेंट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
फोटो पाहून विशाल खरंच झाला नाराज?
पायल आणि सलमानचा फोटो पाहिल्यानंतर विशालने त्यावर एक कमेंट केली आहे. ही कमेंट पाहिल्यावर विशालला खरंच सलमानचा राग आलाय का असा प्रश्न नेटकऱ्यांमध्ये उपस्थित झाला. परंतु, विशालला राग आला नसून त्याने मजेमध्येच या फोटोवर कमेंट केली आहे.
काय आहे विशालची कमेंट?
सलमान आणि पायलचा फोटो पाहिल्यावर "मला वाटतंय, आता मलाही अजय देवगण व्हावं लागेल", अशी कमेंट त्याने या फोटोवर केली आहे. विशेष म्हणजे विशालने या फोटोचा संबंध 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटासोबत जोडला आहे. या चित्रपटात वनराज (अजय देवगण) नंदिनीला (ऐश्वर्या) तिचं प्रेम मिळावं यासाठी थेट इटलीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे पायलला सुद्धा तिचं प्रेम मिळवण्यासाठी मला अजय देवगण व्हावं लागतंय की काय असा खट्याळ प्रश्न त्याने विचारला आहे.
कोण आहे पायल शेट्टी?
विशालची गर्लफ्रेंड असलेली पायल शेट्टीदेखील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने शाकुंतलम या ऐतिहासिक नाटकात काम केलं आहे. तसंच ती एक कथ्थक डान्ससुद्धा आहे. पायलने अनेक ब्रँडसाठी रॅम्पवॉक केला असून ती एक मॉडेलदेखील आहे.