Join us

'मुलींनी डिपनेक लाइनचे कपडे..'; सिनेमाच्या सेटवर मुलींसाठी भाईजानचा खास नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 2:47 PM

Salman khan: सिनेमाच्या सेटवर सलमानने तोकडे कपडे परिधान करणाऱ्या मुलींसाठी काही खास नियम तयार केले होते, असं पलकने एका मुलाखतीत सांगितलं.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) याचा 'किसी का भाई किसी की जान' (kisi ka bhai kisi ki jaan) हा चित्रपट  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे.अलिकडेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या माध्यमातून सलमानने अनेक नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं आहे. त्यामुळे हा सिनेमा सातत्याने चर्चेत येत आहे. या सिनेमामधून बिग बॉसफेम शहनाज गिल आणि पलक तिवारी (palak tiwari) बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने पलकने अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सेटवर भाईजान कसे नियम तयार करतो. याविषयी भाष्य केलं आहे.

'किसी का भाई किसी की जान' या सिनेमापूर्वी पलकने अंतिम सिनेमामध्ये सलमानसोबत काम केलं आहे. या सिनेमात तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. या सिनेमाच्या सेटवर सलमानने तोकडे कपडे परिधान करणाऱ्या मुलींसाठी काही खास नियम तयार केले होते, असं पलकने एका मुलाखतीत सांगितलं.

निगेटिव्ह शक्तींवर आहे सलमानचा विश्वास? 'या' खास कारणासाठी वापरतो निळ्या खड्याचं ब्रेसलेट

"अंतिमच्या सेटवर सलमानने मुलींसाठी काही नियम तयार केले होते. यात सेटवर मुलींना डीप नेकलाइनचे कपडे परिधान करण्यास सक्त मनाई होती. तसंच मुलींना पूर्ण अंगभर कपडे परिधान करुन यायचं असंही त्यांनी सांगितलं होतं. मुळात हे सारं काही मुलींचया सुरक्षेच्या दृष्टीनेच त्यांनी सांगितलं होतं", असं पलक म्हणाली.

'सलमानला हटवा अन् मला बिग बॉसचा होस्ट करा'; Dino Morea ने दिली शोला ऑफर?

दरम्यान, ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. यात शहनाज गिल, पलक तिवारी, डान्सर राघव जुयाल, टीव्ही अभिनेता सिद्धार्थ निगम हे या सिनेमात झळकणार आहेत. तसंच पूजा हेगडे,भूमिका चावला, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, ही दिग्गज कलाकार मंडळीही झळकणार आहेत. या सिनेमासाठी सलमानने तब्बल ५० कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचं सांगण्यात येतं. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा