Join us  

सलमान खानने कतरिना कैफचा पती विकी कौशलची उडवली खिल्ली, अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 11:15 AM

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif)चा 'टायगर ३' (Tiger 3) चित्रपट रिलीज होऊन ६ दिवस उलटले आहेत. हा चित्रपट सातत्याने चांगली कमाई करत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif)चा 'टायगर ३' (Tiger 3) चित्रपट रिलीज होऊन ६ दिवस उलटले आहेत. हा चित्रपट सातत्याने चांगली कमाई करत आहे. 'टायगर ३' चित्रपटाने जवळपास २०० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशाबद्दल स्टार्स खूप आनंदी असून गेल्या शुक्रवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी पोहोचले आणि चाहत्यांशी बोलून त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमादरम्यान सलमान खानने खूप मजा केली. सलमान खानने कतरिना कैफचा पती विकी कौशलची खिल्ली उडवली.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान पाय खेचण्यात खूप अग्रेसर आहे. सलमान खानचा 'टायगर ३' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरू असून लोकांचे मनोरंजन करत आहे. 'टायगर ३' चित्रपटासाठी एका इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यादरम्यान सलमान खानने खूप धमाल केली. या इव्हेंट  दरम्यान सलमान खानने कतरिना कैफचा पती विकी कौशलबद्दल कमेंट केली. 

खरेतर, एका चाहत्याने पुष्पगुच्छ आणला होता आणि सलमान खानने तो कोणासाठी आणला असे विचारले. यावर चाहत्याने सांगितले की, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. यावर सलमान खान चाहत्याला म्हणाला, 'माझ्यासाठी वेडा झाला आहेस, एक मुलगा मुलीसाठी पुष्पगुच्छ आणतो. कतरिना कैफसाठी तू पुष्पगुच्छ आणल्यासारखे वाटले. तो (विकी) खूप लांब आणि रुंद आहे आणि तुला खूप जोरात मारेल. असे म्हणत सलमान खानने विकी कौशलची खिल्ली उडवली. सलमानचे हे वक्तव्य ऐकून कतरिना कैफलाही हसू आवरलं नाही.

सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीचा चित्रपट 'टायगर ३' चे दिग्दर्शन मनीष शर्माने केले आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी पती पत्नीची भूमिका साकारली असून इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफविकी कौशल