बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) आज बॉलिवूडचा सगळ्यात लोकप्रिय व महागडा सुपरस्टार आहे. म्हणायला सलमानने वयाची पन्नाशी ओलांडलीये, पण आजही त्याच्याकडे अनेक ऑफर्स आहेत. बॉलिवूडचा प्रत्येक निर्माता, दिग्दर्शक, प्रत्येक हिरोईन त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. पण एकेकाळी याच सलमानला साईन करायचं म्हटलं की निर्माते पळ काढायचं. होय, मैंने प्यार किया या सिनेमाआधी सलमानला बराच मोठा स्ट्रगल करावा लागला. मैंने प्यार किया सुपरहिट झाला आणि मग मात्र सलमानच्या घराबाहेर निर्मात्यांच्या रांगा लागायला लागल्या. या काळात त्याने अनेक सिनेमे साईन केलेत. आश्चर्य वाटेल पण यापैकी अनेक सिनेमे रिलीजच झाले नाहीत....
रणक्षेत्र...सलमानचा रणक्षेत्र हा सिनेमा आजपर्यंत रिलीज झालेला नाही. मैंने प्यार किया या चित्रपटानंतर भाग्यश्री व सलमानची जोडी सुपरहिट झाली होती. यानंतर दोघांनी रणक्षेत्र नावाचा सिनेमा साईन केला होता. पण याचदरम्यान भाग्यश्रीने लग्न केलं आणि चित्रपटात काम करणं सोडलं. मग काय, सलमान व भाग्यश्रीचा रणक्षेत्रही रखडला. सिनेमा डब्बाबंद झाला. या सिनेमासाठी दिग्दर्शकाला यानंतर कोणतीच हिरोईन मिळाली नाही, असंही म्हटलं जातं.
दिल है तुम्हारा...२००२ साली दिल है तुम्हारा नावाचा सिनेमा रिलीज झाला होता. यात प्रीती झिंटा, अर्जुन रामपाल, महिमा चौधरी व रेखा मुख्य भूमिकेत होते. पण याच नावाचा सिनेमा सलमान करणार होता. १९९१ साली या चित्रपटाची घोषणा झाली होती. त्याच्यासोबत सनी देओल व मिनाक्षी शेषाद्री होते. दिग्दर्शक राजकुमार संतोषी सिनेमाचे दिग्दर्शक होते. चित्रपटाचं शेड्यूल पूर्ण झालं होतं, पण याचदरम्यान संतोष यांनी बॉबी देओलचा बरसात साईन केला आणि सलमानचा सिनेमा कायमचा रखडला.
बुलंदसलमान सोमी अलीला डेट करत होता तेव्हा त्याने बुलंद नावाचा सिनेमा साईन् केला होता. यात सोमी हीच सलमानची हिरोईन् होती. सिनेमाचं ८० टक्के शूट झालं होतं. पण का कुणास ठाऊक पुढे हा सिनेमा रखडला तो कायमचाच.
सैय्यासैया नावाचा सलमानचा सिनेमाही अचानक रखडला. या सिनेमात माला सिन्हाची मुलगी प्रतिभा सिन्हा सलमानची हिरोईन होती. सैय्या या सिनेमातून तिचा डेब्यू होणार होता. या सिनेमाचा मुहूर्त झाला, याचा व्हिडीओही शेअर केला गेला होता. पण काही कारणास्तव हा सिनेमा बनू शकला नाही.
ऐ मेरे दोस्त...ऐ मेरे दोस्त नावाच्या सिनेमात सलमानसोबत अरबाज खान, करिश्मा कपूर, दिव्या भारती दिसणार होते. या सिनेमाचं एक गाणंही शूट झालं होतं. पण काही कारणास्तव हा सिनेमा कायमचा बंद झाला. शूट झालेलं गाणं नंतर सलमानच्या मझधार मध्ये वापरलं गेलं.
रामसलमानचा भाऊ सोहेल खानने १९९४ साली राम या सिनेमाची घाेषणा केली होती. हा सिनेमा सोहेल दिग्दर्शित करणार होता. या चित्रपटासाठी सलमान, पूजा भट, अनिल कपूर यांना साईन् करण्यात आलं होतं. अर्ध अधिक शूटींग झालं आणि हा सिनेमा अचानक थांबला. असं म्हणतात की, सिनेमाचा बजेट मर्यादेपलीकडे गेला होता. यावरून वाद झालेत आणि हा सिनेमा कधीच बनू शकला नाही. याशिवाय घेराव, सागर से गहरा प्यार, हँडसम, राजू राजा राम असे त्याचे सिनेमेही काही कारणास्तव कधीच बनू शकले नाहीत.
चोरी मेरा नामसुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, काजोल आणि सलमान यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झालं. पण का कुणास ठाऊक पण अर्ध्यावरच थांबलं.
घेरावघेराव नावाचा सिनेमा सलमानने साईन केला होता. यात मनीषा कोईराला त्याची हिरोईन होती. पण हा चित्रपट मुहूर्तानंतर लगेचच बंद झाला...