Join us  

सावत्र आईचा ऑनस्क्रीन लेक झाला होता सलमान खान; 'या' सिनेमात हेलन यांच्याबरोबर केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 5:17 PM

सलमान आणि हेलन यांनी काही सिनेमांत एकत्र काम केलं आहे. यापैकी एका सिनेमात सलमान खानने हेलन यांच्या मुलाची भूमिका साकारली होती.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे लाखो चाहते आहेत. ९०चं दशक गाजवणारा सलमान आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. बीवी हो तो ऐसी सिनेमातूनसलमान खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  हम आपके है कौन, हम साथ साथ है, मैने प्यार किया, बीवी नंबर १, जीत, अंदाज अपना अपना, करण अर्जुन अशा सुपरहिट सिनेमांमध्ये सलमानने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. सलमानच्या ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक म्हणजे हम दिल दे चुके सनम. ऐश्वर्या राय, अजय देवगण, सलमान खान अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. 

१९९९ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात सलमानने समीर राफलिनी हे पात्र साकारलं होतं. ऐश्वर्या बच्चन नंदिनी तर अजय देवगण अॅडव्होकेट वनराजच्या भूमिकेत होता. नंदिनी आणि समीर एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले असतात. पण, नंदिनीचं तिच्या मनाविरुद्ध वनराजशी लग्न लावलं जातं. वनराजला हे माहीत झाल्यानंतर तो नंदिनीचा प्रियकर समीरच्या शोधात निघतो आणि त्यांची भेट घडवून देतो. अशी सिनेमाची कथा होती. या सिनेमातील गाणीही प्रचंड हिट ठरली होती. या सिनेमात सलमान खानने त्याची सावत्र आई हेलन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. हेलन यांनी या सिनेमात सलमानच्या आईची भूमिका साकारली होती. 

हम दिल दे चुके सनम सिनेमाव्यतिरिक्त सलमान आणि हेलन यांनी आणखी काही सिनेमांत एकत्र काम केलं आहे. या सिनेमाआधी १९९६ साली प्रदर्शित झालेल्या खामोशी चित्रपटात ते एकत्र दिसले होते. दिल ने जिसे अपना कहा, मारीगोल्ड या सिनेमांतही सलमान आणि हेलन यांनी स्क्रीन शेअर केली होती. पण, केवळ एकाच सिनेमात त्यांनी आई आणि मुलाची भूमिका साकारली. 

हेलन या सलमानचे वडील सलीम खान यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. सलीम खान यांनी १९६४ साली सुशिला यांच्याशी निकाह केला होता. त्यांच्यापासून त्यांना अरबाज, सोहेल आणि सलमान ही मुले आहेत. १९८१ साली हेलन यांच्याशी त्यांनी दुसरा विवाह केला. 

टॅग्स :सलमान खानहेलनसेलिब्रिटीसिनेमा