Join us  

काय सांगता? हॉलिवूड स्टारसमोर सलमानला सांगावी लागली स्वत:ची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 3:20 PM

Salman khan :आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या सलमानला  एका हॉलिवूड स्टारने ओळखलंच नव्हतं.

बॉलिवूडचा भाईजान, दबंग खान या आणि अशा असंख्य नावाने कलाविश्वात ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सलमान खान (Salman Khan. गेल्या कित्येक वर्षांपासून सलमान खान कलाविश्वासह प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळे आजच्या घडीला सलमानला कोणी ओळखत नाही असं म्हणणारे सापडणं तसं कठीणच आहे. तरुणींच्या गळ्यातलं ताईत असलेल्या सलमानची लोकप्रियता देशासह विदेशातही पसरली आहे. त्यामुळे त्याच्या नावाची कायमच चर्चा होत असते. सध्या त्याचा असाच एक किस्सा चर्चेत आला आहे. आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या सलमानला  एका हॉलिवूड स्टारने ओळखलंच नव्हतं.

स्वत:लाच सांगावी लागली ओळख

काही वर्षांपूर्वी जनरल एन्टरटेन्मेंट अथॉरिटीच्या एका आयोजित पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सलमान सौदी अरबला गेला होता. यावेळी त्याची भेट हॉलिवूड स्टार जॉन ट्रॅवोल्टा (John Travolta) याच्यासोबत झाली. या दोघांचा त्यावेळचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परंतु, या भेटीत जॉनने सलमानला ओळखलं नव्हतं. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच सलमानला त्याची ओळख करुन द्यावी लागली.

सोशल मीडियावरही या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सलमान, जॉनजवळ जातो आणि त्याच्या परफॉर्मन्सचं कौतुक करतो. तसंच आपण बॉलिवूडमध्ये काम करत असून माझं नाव सलमान खान असल्याचं तो सांगतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर तुफान कमेंटचा पाऊस पाडला होता.

दरम्यान, हा किस्सा जरी जुना असला तरीदेखील आज जगभरात सलमानला प्रचंड लोकप्रिय आहे. सलमान लवकरच 'टायगर 3', 'किक 2', 'कभी ईद कभी दिवाली', 'डांसिंग डॅड', 'पवन पुत्र भाईजान', 'दबंग 4' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. 

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाहॉलिवूड