Join us  

प्रभास झाला सलमान, शाहरूखपेक्षाही महाग; आता मोजावे लागणार ८० कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2017 4:46 AM

‘बाहुबली’ प्रभास सध्या जोरात आहे. साऊथमध्ये प्रभासचा बोलबाला होताच. ‘बाहुबली2’नंतर प्रभास बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध झाला. इतका की, आज बॉलिवूडचे अनेक ...

‘बाहुबली’ प्रभास सध्या जोरात आहे. साऊथमध्ये प्रभासचा बोलबाला होताच. ‘बाहुबली2’नंतर प्रभास बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध झाला. इतका की, आज बॉलिवूडचे अनेक बडे मेकर्स प्रभासला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सूक आहेत. अशात प्रभासचे भाव वाढणे साहजिक आहे. होय, प्रभासने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. एका चित्रपटासाठी तो थोडे थोडके नव्हे तर ८० कोटी रूपयांची मागणी करत असल्याचे ऐकवात येतेय. अर्थात मानधनाचा हा आकडा खरा की खोटा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण हा आकडा खरा असेल तर तो सलमान खान आणि शाहरूख खान याच्यापेक्षाही मोठा म्हणायला हवा. म्हणजेच प्रभास खरचं ८० कोटी रुपये इतके मानधन आकारत असेल तर त्याने सलमान, शाहरुखलाही या बाबतीत मागे टाकले,असेच म्हणावे लागेल.ALSO READ : राजमौली यांनी उघड केले, प्रभासचे ‘टॉप सीक्रेट’ !!प्रभास लवकरच ‘साहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा बजेट तब्बल १५० कोटी रुपयांचा असल्याचे कळतेय. या वर्षा अखेरपर्यंत प्रदर्शित होणारा हा चित्रपट तीन भाषांत प्रदर्शित होणार आहे. येत्या काळात प्रभास बॉलिवूड डेब्यू करणार अशीही चर्चा सध्या रंगते आहे. करण जोहरसह रोहित शेट्टी प्रभासला घेऊन चित्रपट काढण्यात उत्सूक असल्याची बातमी कालपरवाच आली. सूत्रांचे खरे मानाल तर, रोहित शेट्टीला प्रभासला घेऊन चित्रपट काढायचा आहे. केवळ इतकेच नाही तर ‘बाहुबली2’च्या तोडीचा ब्लॉकबस्टर अ‍ॅक्शनपट रोहित शेट्टीला तयार करायचा आहे. या चित्रपटात प्रभाससोबत सलमान खानला कास्ट करण्याचा रोहितचा विचार आहे. अर्थात हा विचार सत्यात उतरवण्यासाठी रोहित शेट्टीला ८० कोटी रुपए तयार ठेवावे लागणार आहेत.