Join us  

गणपतीच्या कानात सलमान खान काय म्हणाला? गणेशभक्तांसाठी 'भाईजान'ने सांगितली महत्त्वाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 6:47 PM

नुकतंच एका कार्यक्रमामध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सर्वांना आपल्या घरी इको-फ्रेंडली गणपती आणण्याचं आवाहन केलं आहे. 

Salman Khan : देशभरात गणेशोत्सव हा सण  मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्याच घरी बाप्पाचे आगमन होते. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घरी देखील बाप्पा विराजमान होतात. नुकतंच एका कार्यक्रमामध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सर्वांना आपल्या घरी इको-फ्रेंडली गणपती आणण्याचं आवाहन केलं आहे. 

मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सलमान खानही उपस्थित होता. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे.  सलमान खान म्हणतो, "प्रत्येकानं इको-फ्रेंडली गणेशा घरी आणावा आणि त्याचे विसर्जन तुमच्या सोसायटीत, तुमच्या इमारतीत, घरात करावं. जेणेकरुन मूर्ती पूर्णपणे विरघळेल. किती वाईट वाटतंय की तुम्ही लोक पीओपीचा गणपती बनवता आणि मग विसर्जन करता. यानंतर समुद्राजवळ गेलात तर अर्धा गणेश तिथं पडलेला दिसतो. तुमचा पाय त्यांना लागतो आणि ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे इको फ्रेंडली गणपती घरी आणा".

पुढे तो म्हणतो, "पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव साजरा केला पाहिजे. गणेशमूर्ती ही मिलावट नसलेली, पर्यावरणाला नुकसान न पोचवणारी असली पाहिजे . गणेशोत्सवा दरम्यान स्वच्छतेचे पालन देखील होणे तितकेच आवश्यक आहे. मी कचरा करणार नाही आणि कचरा होऊ देणार नाही", असे आवाहन सलमान खानने केले आहे. एवढंच नाही तर सलमान खानने आपली इच्छा गणपतीच्या कानात सांगितल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. 

गणेश चतुर्थीचा सण चातुर्मासात येतो. यादिवशी पार्थिव गणेशाची स्थापना होते आणि दहा दिवसानंतर अनंत चतुर्थीला गणेश मुर्ती विसर्जीत केली जाते. यंदा येत्या ७ सप्टेंबर रोजी देशभरात मोठ्या उत्साहात गणपतीचं घरी आगमन होणार आहे.  त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.  

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीबॉलिवूडगणेशोत्सवइको फ्रेंडली गणपती 2024