ऑस्कर २०२२ (Oscar 2022) यावेळी सिनेमांमुळे कमी आणि वादामुळेच जास्त चर्चेत राहिलं. हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (Will Smith) याने स्टेजवर जाऊन होस्ट कॉमेडिअन क्रिस रॉकला कानाशीलात लगावली. सध्या जगभरात याचीच चर्चा रंगली आहे. विल स्मिथच्या या कृत्यावर जगभरातील सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. कुणी विल स्मिथची निंदा करत आहेत तर कुणी त्याला सपोर्ट करत आहे. सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) यानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सलमान खान म्हणाला की, होस्ट्सने फार सतर्क रहायला हवं. IIFA च्या प्रेस लॉन्च इव्हेंटमध्ये सलमान खानला विचारण्यात आलं की, होस्टने आपल्या जोक्सबाबत सावधान रहायला हवं का? याचं उत्तर देत सलमान म्हणाला की, एक होस्ट म्हणून तुम्ही सेन्सिटिव्ह व्हायला हवं. गंमत मर्यादेत राहून केली पाहिजे. सीमा ओलांडू नये. या इव्हेंटमध्ये सलमान खानसोबत वरूण धवन आणि मनीष पॉल उपस्थित होते. त्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. वरूण म्हणाला की, समोरची व्यक्ती ऑफेंड होऊ शकतात. अशात होस्टने सावधान रहायला हवं.
मनीष पॉल काय म्हणाला?
मनीष पॉलने अनेक टीव्ही शोज आणि इव्हेंट होस्ट केले आहेत. तो म्हणाला की, तो मर्यादेत राहण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी गोष्टी सेन्सिटिव्ह होतात. आधी मजा-मस्ती मोकळेपणाने होत होती. पण आता गोष्टी जास्त सेन्सिटिव्ह झाल्या आहेत. जेव्हा मी स्टेजवर असतो मी कुणाला ऑफेंड केलं नाही. हे सगळं तुमच्या सेन्स ऑफ ह्यूमरवर अवलंबून असतं.
IIFA बाबत सांगायचं तर २२व्या एडिशनचं होस्टिंग सलमान खान आणि रितेश देशमुख करेल. हा अवॉर्ड शो २०-२१ मे ला अबूधाबीमध्ये होणार आहे. सलमान खान स्वत: टीव्ही शो बिग बॉसचा होस्ट आहे. सलमान खान कूल आणि अग्रेसिव्ह अंदाज पसंत केला जातो.