Join us

आधी गिप्पी ग्रेवालच्या घरावर हल्ला; आता सलमान खानला धमकी, पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 5:46 PM

Salman Khan receives death threat: धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेतला.

Salman Khan receives death threat:बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमानला यापूर्वीही अनेकदा लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. आता या नव्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेतला.

बुधवारी(दि.29) एएनआय वृत्तसंस्थेने सलमान खानला फेसबुक पोस्टद्वारे धमकी मिळाल्याची माहिती दिली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई पोलिसांनी सांगितले की, धमकी मिळाल्यानंतर सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. मात्र, या नव्या धमकीचा लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीकडून मिळालेल्या इतर धमक्यांशी संबंध आहे का, याबाबत स्पष्टता नाही.

पोलिसांनी केले सलमानला सतर्क मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानसोबतच्या मैत्रीच्या अफवांवरुन लॉरेन्स बिश्नोईने गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील घराबाहेर गोळीबार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सलमानला सतर्क राहण्यास सांगितले होते. आता या धमकीनंतर कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अभिनेत्याच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडपोलिस