बॉलिवूडमध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खानमधील (Salman Khan) केमिस्ट्रीबद्दल नेहमीच चर्चा असते. बऱ्याचदा दोघांचे आपसात एकमेंकाशी पटत नसल्याचे कानावर येते पण हे खरं नाही. दोन्ही स्टार अभिनेते एकमेकांचा खूप आदर करतात. अलीकडेच बॉलीवूडचा दबंग खानने असे काही केले की त्यांच्या मैत्रीबाबत होत असणाऱ्या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम लावला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार दोनही खानमध्ये इतकी पक्की मैत्री आहे की शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमात काम करण्यासाठी कोणतेच मानधन घेतलं नाही.
शाहरुख खान आपल्या आगामी ‘पठाण’ सिनेमालाविषयी चर्चेत आहे. 'झिरो' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरुखचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटावरून अभिनेता तीन वर्षानंतर आपला अभिनय दाखवण्यास येत आहे. शाहरुख खान तसेच सलमान खान यांच्यामुळेही 'पठाण' चित्रपट अधिक चर्चेत आहे. दोघांना एकत्र पहाण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आहेत. या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करत आहे. सलमानने फेब्रुवारीत त्याचे शूटिंग पूर्ण केले आहे.