बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. गेल्या काही दिवसांत अर्जुन व मलायका अगदी बिनधास्त, खुल्लम खुल्ला फिरताना दिसत आहेत. आता तर अर्जुनच्या कुटुंबानेही या नात्याचा स्वीकार केला आहे. पण एका व्यक्तिला मात्र अद्यापही अर्जुन व मलायकाच्या रिलेशनशिपची गोष्ट पचवता आलेली नाही. होय, ही व्यक्ती म्हणजे, मलायकाचा एक्स हसबण्ड अरबाज खान याचा भाऊ सलमान खान. होय, अरबाज व मलायकाचा म्हणायला घटस्फोट झालाय. पण सलमानचा राग शमलेला नाही. त्याने केवळ मलायका व अर्जुनसोबतचं नाही तर अर्जुनचे पापा बोनी कपूरसोबतचेही सगळे संबंध तोडले आहेत.
चर्चा खरी मानाल तर भाईजानने खान कुटुंबाच्या कुठल्याही समारंभात अर्जुन व बोनी कपूर यांची एन्ट्री बॅन केली आहे. आता इतके असताना बोनी कपूरच्या चित्रपटांत भाईजान काम करणार, हे अशक्य दिसतेय. एक ताजी बातमी मानाल तर, बोनी कपूरच्या बॅनरखाली काम करण्यासही सलमानने नकार दिला आहे. सलमानच्या या निर्णयानंतर बोनी कपूरच्या बॅनरचे ‘नो एन्ट्री में एन्ट्री’ आणि ‘वॉन्टेट 2’ हे चित्रपट आता कधीही बनणे शक्य नाही.
‘वॉन्टेड’ आणि ‘नो एन्ट्री’ हे दोन चित्रपट सलमानच्या फिल्मी करिअरमधील दोन ‘गेम चेंजर’ चित्रपट आहेत. सलमानचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर धडाधड आपटत असताना याच दोन चित्रपटांनी त्याची बुडती नौका सावरली होती. याच दोन चित्रपटांनी सलमानला पुन्हा एकदा ‘ए लिस्ट अॅक्टर्स’च्या यादीत आणून बसवले होते. ‘वॉन्टेड’नंतर सलमानच्या हिट चित्रपटांचा ‘सिलसिला’ अद्याप थांबलेला नाही.
पण भाईजानचा राग तर तुम्ही जाणताच. एकदा घेतलेला निर्णय भाईजान सहसा बदलत नाही. त्यामुळे बोनी कपूरच्या बॅनरखाली भाईजान पुन्हा काम करणे शक्य नाही आणि त्यामुळेच ‘नो एन्ट्री में एन्ट्री’ आणि ‘वॉन्टेट 2’ हे दोन्ही चित्रपट बनणेही शक्य नाही.