Join us

VIDEO : ‘धर्मवीर’ सिनेमाच्या ट्रेलर लाँचदरम्यान सलमान खानने केलं असं काही, जिंकली सगळ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 2:57 PM

Salman Khan at Dharmaveer Mukkam Post Thane Trailer Launch: नुकताच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट पार पडला. इव्हेंटमध्ये भाईजाननं जे काही केलं ते पाहून सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली.

Salman Khan : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) हा सिनेमा येत्या 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रवीण तरडे लिखित व दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील दिग्गज अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटात धर्मवीर आनंद दीघेंची भूमिका जिवंत करणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट पार पडला. या इव्हेंटला राजकीय व कला विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे असे सगळे या सोहळ्याला हजर होते. शिवाय बॉलिवूडचा भाईजान  सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेता रितेश देशमुख हेही या सोहळ्याला हजर होते. पण चर्चा रंगली तर भाईजानची. होय, इव्हेंटमध्ये भाईजाननं जे काही केलं ते पाहून सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली.

याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओत, सलमान मंचावर दिसतो. तो मंचावर येतो आणि मंचावर येताच पायातील बूट काढतो. यानंतर तो छत्रपती शिवाजी महाराज,बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघें यांच्या प्रतिमेला वंदन  करतो. प्रतिमेला पुष्प अर्पण केल्यानंतर सलमान पुन्हा एकदा पायात बुट चढवून मंचावरून खाली उतरतो.  सध्या सलमान खानच्या या कृतीची सवर्त्र चर्चा होत आहे. त्याच्या या कृतीने त्याने सगळ्यांची मन जिंकली आहेत.

अन् सलमान मराठीत बोलला...मंचावर सलमानने ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’च्या ट्रेलरचं कौतुक केलं. विशेष म्हणजे, आपल्या भाषणाची सुरूवात त्यानं मराठीत केली. नमस्कार...मी आता मराठीत बोलणार आहे. माझं नाव सलमान खान आहे. मला हा ट्रेलर फार आवडला, असं तो म्हणाला. यानंतर त्याने हिंदीत भाषण केलं. आत्ताच मी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करत होतो, त्यावेळी त्यांनी दिघे साहेबांबद्दल ब-याच गोष्टी सांगितल्या. यातल्या काही गोष्टीत मला माझ्यात आणि त्यांच्या साम्य जाणवले. त्यातील एक म्हणजे ते एका बेडरुममध्ये राहायचे आणि मी देखील एकाच बेडरुममध्ये राहतो. दुसरं म्हणजे त्यांचेही लग्न झालेलं नव्हतं आणि माझंही झालेलं नाही, असं तो म्हणाला. सरतेशेवटी जयहिंद, जय महाराष्ट्र असं म्हणत त्याने आपलं भाषण संपवलं.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसिनेमा