कलाविश्वातील श्रीमंत कलाकारांच्या यादीत अभिनेता सलमान खान (salman khan) याचं नाव कायम अग्रस्थानी घेतलं जात. आजवरच्या कारकिर्दीत सलमानने अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. त्यामुळे सलमानचा आज कलाविश्वातील भावदेखील तितकाच वधारलेला आहे. सलमान एका सिनेमासाठी कोटीच्या कोटी रुपये मानधन घेतो. इतकंच नाही तर अभिनयाव्यतिरिक्त अन्य व्यवसाय, जाहिराती, स्वत:चा ब्रँड यांच्या माध्यमातून तो महिन्याला कोट्यवधींची कमाई करते. विशेष म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक कमाई करणाऱ्या सलमानची सांताक्रूझमध्येही प्रॉपर्टी आहे. या पॉपर्टीच्या माध्यमातून तो प्रचंड मोठी कमाई करतो. म्हणूनच, सलमानच्या सांताक्रूझमधील एका घराचं भाडं किती ते जाणून घेऊयात.
सलमानचं मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर तर साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, या घराव्यतिरिक्त त्याचं सांताक्रूझमध्येही एक अपार्टमेंट आहे. २०१२ मध्ये त्याने ही चार मजली इमारत खरेदी केली होती. विशेष म्हणजे ही सगळी इमारत त्याने भाड्याने दिली असून यातील एका घराची किंमत चक्क कोटींच्या घरामध्ये आहे.
२०१२ मध्ये खरेदी केलेली ही इमारत सलमानच्या वडिलांनी सलीम खान यांनी एका रिटेल चेन फूड हॉलला भाड्याने दिली होती. या इमारतीचं वर्षाचं भाडं ८९. ६० लाख रूपये इतके होतं. त्यासाठी कंपनीने २.४० कोटी रुपयांचं डिपॉझिटही दिलं होतं. ५ वर्षांसाठी करण्यात आलेला हा भाडेतत्वाचा करार पुढे २ वर्षांसाठी वाढवण्यात आला. त्यामुळे हे भाडं वाढवून ९४.०१ लाख रुपये असं करण्यात आलं होतं. परंतु, कंपनीने पुढे वेळात भाडं न भरल्यामुळे सलमानने हा करार रद्द केला. त्यानंतर त्याने या इमारतीमधील घरे भाड्याने देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे या इमारतीमधील एका घराचं भाडं हे प्रचंड जास्त असून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.
सलमानच्या या इमारतीमधील एक घर त्याने भाड्याने दिलं आहे. विशेष म्हणजे या घरासाठी सलमान १ कोटींपेक्षा जास्त रुपये भाडं म्हणून स्वीकारतो. दरम्यान, सलमानची वर्षाची कमाईही २२० कोटी रुपये इतकी आहे. तो महिन्याला १६ कोटी रुपये कमावतो. तर, एका सिनेमासाठी तो १०० कोटी रुपये चार्ज करतो. सलमानचा टायगर ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इमरान हाशमी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.