Join us

"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 9:40 AM

सलमान खानने एका जुन्या मुलाखतीदरम्यान त्याने काळवीटाची शिकार केली नाही याबद्दल स्पष्ट खुलासा केलाय (salman khan)

सध्या बॉलिवूडमध्ये एका गोष्टीची चांगलीच चर्चा आहे ती म्हणजे सलमान खान आणि त्याला मिळणाऱ्या धमक्यांची. लॉरेन्स बिष्णोई आणि त्याच्या गँगकडून सलमान खानला  गेल्या काही महिन्यांपासून वारंवार धमक्या मिळत आहेत. इतकंच नव्हे अज्ञात व्यक्तींनी काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. याशिवाय सलमानचे निकटवर्तीय आणि राजकीय व्यक्ती बाबा सिद्दीकींची हत्या झाली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सध्या विचित्र माहोल असताना सलमान खानचा जुना व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत मी काळवीटाची शिकार केली नाही, याचा खुलासा सलमान करताना दिसतोय. 

सलमानचा जुना व्हिडीओ व्हायरल

रेटीट या व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर सलमान खानचा हा जुना व्हिडीओ व्हायरल झालाय. २००८ ला इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत सलमानने याविषयी खुलासा केला होता. जेव्हा पत्रकार सलमानला याविषयी विचारते तेव्हा सलमान म्हणतो, "ही खूप मोठी कहाणी आहे. पण मी काळवीटाची शिकार केली नाही." सर्व आरोप स्वतःवर घेतले, दुसऱ्या कोणाचं नाव नाही घेतलं असं विचारताच सलमान म्हणतो, "याला काही अर्थ नव्हता." पुढे तुरुंगातला अनुभव विचारताच सलमान हसत हसत म्हणतो, "मला मजा आली."

सलीन खान याविषयी काय म्हणाले?

याप्रकरणाविषयी बोलताना सलीम खान म्हणाले की, ""ना मी कोणत्या प्राण्याची हत्या केली आहे. ना सलमानने केली आहे.  आम्ही कधी साधं झुरळही मारलेलं नाही. मी सलमानला विचारलं होतं की हे कोणी केलं आहे. त्याने मला सांगितलं होतं की तो तिथे नव्हताच. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो कारमध्येही नव्हता. आणि तो माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. आमच्याकडे बंदूकही नाहीये.सलमानला प्राण्यांना वगैरे मारण्याचा शौक नाही. तो प्राण्यांवर प्रेम करतो". आता सलमानची ही जुनी मुलाखत व्हायरल झाल्याने त्याला येणाऱ्या धमक्या बंद होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूड