कतरिना कैफबॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री आहे. कतरिनाने आत्तापर्यंत शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या तिघांसह सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिला कतरिनाला बॉलिवूडची क्वीन असं संबोधलं जातं. कतरिनाने आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. विदेशातून भारतात येऊन बॉलिवूडमधील आतापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता.
कतरिनाने २००३ मध्ये बूम या सिनेमातून तिचं करिअर सुरु केलं होतं. पण, तो सिनेमा फ्लॉप झाला. यानंतर मुकेश भट्ट यांनी तिला ‘साया’ चित्रपटाची ऑफर दिली. अनुराग बासू हा चित्रपट बनवणार होते. कतरिनाच्या सोबत जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाचा पहिला शॉट घेण्यात आला आणि तो शॉट कतरिनाचा शेवटचा ठरला. तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. कतरिनाला हिंदी अजिबात कळत नसल्याचे निर्मात्यांनी सांगितले. तिच्या जागी तारा शर्माला घेण्यात आले होते. यानंतर कतरिना पुर्णपणे निराश झाली होती.
सलमान खानने 'आप की अदालत'च्या एका एपिसोडमध्ये सांगितले की, 'साया'मधून बाहेर फेकल्यानंतर कतरिना तीन दिवस रडत राहिली. आपलं करिअर बरबाद झालं असं तिला वाटत होतं'. तेव्हा मला असं वाटलं ही पुढे जाऊन मोठी अभिनेत्री होणार मग आता का रडते. तेव्हा मी तिला म्हणालो तू आता रडत आहेस, पण पुढे जावून हा दिवस आठवला की तू पोट धरून हसशील... '. अखेर सलमानचं म्हणणं खरं झालं. आज कतरिना प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
कतरिनाने ‘सरकार ’, ‘राजनीती ’, ‘वेलकम’, ‘जब तक है जान’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ एक था टायगर हा, टायगर जिंदा है यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता कतरिना 'टायगर 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टायगर 3 निमित्ताने सलमान - कतरिना दिवाळीमध्ये बॉक्स ऑफीस धमाका करण्यासाठी सज्ज आहेत.