Join us

आमिर खानच्या अफेअरबाबत चक्क सलमान खानने केला खुलासा, पाहा हा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 12:20 IST

सलमानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत तो आमिरच्या अफेअरबाबत चक्क खुलासा करताना दिसत आहे.

ठळक मुद्देआमिर खानने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधीच त्याचे रिना दत्तासोबत लग्न केले होते.

बॉलिवूडमध्ये अनेक वर्षं सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांचे राज्य आहे. आमिर आणि सलमानने त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अंदाज अपना अपना या चित्रपटात काम केले होते. 

सलमान आणि आमिरची गेल्या अनेक वर्षांपासून खूप चांगली मैत्री आहे. पण अंदाज अपना अपना या चित्रपटाच्यावेळी त्या दोघांचे नाते इतके चांगले नव्हते. सलमानचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत तो आमिरच्या अफेअरबाबत चक्क खुलासा करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ खूपच जुना आहे. कारण या व्हिडिओत सलमान अतिशय बारीक दिसत आहे. तसेच अतिशय रफ अँड टफ उत्तरं देण्यास प्रसिद्ध असलेल्या सलमान यात खूपच लाजरा दिसत आहे. या व्हिडिओत आमिर खानच्या अफेयर्स बद्दल ज्या अफवा चालू आहेत, त्यात काही तथ्य आहे का असे त्याला विचारण्यात येते. त्यावर त्या अफवा आमिरच्या बाबतीत नाहीत, तर त्या माझ्या बाबतीत आहेत. आमिरची इमेज खूपच क्लीन आहे. माहीत नाही तो हे सगळं कसं काय सांभाळतो. एकतर तो खूपच देखणा आहे. त्यात तो विवाहित आहे. तो प्रत्येक वेळी एकच म्हणतो, मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि यामुळेच त्याचा बचाव होतो.

आमिर खानने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधीच त्याचे रिना दत्तासोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुलं असून त्यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. 

टॅग्स :आमिर खानसलमान खान