Join us  

आतापर्यंत सलमान खानच्या इतक्या झाल्या गर्लफ्रेंड; अजय-काजोलसमोर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 4:43 PM

बॉलिवूडचा सुपरस्टार आणि ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे

बॉलिवूडचा सुपरस्टार आणि ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचे आयुष्य हे नेहमीच चर्चेत राहिले. विशेषतः त्याची प्रेमप्रकरणं. सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ ही लिस्ट न संपणारी आहे.  इंडस्ट्रीत बऱ्याच अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे. यातच आता एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजय देवगण आणि काजोल हे सलमानला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत. 

 सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अजय देवगन आणि काजोल सलमान खानच्या बिग बॉस शोच्या सेटवर दिसत आहेत. जिथे काजोल-अजय सलमान खानची लाय डिटेक्टर टेस्ट करताना पाहायला मिळत आहेत. काजोल सलमानला विचारते, 'तुला पाचपेक्षा कमी गर्लफ्रेंड होत्या का?' यावर अजय सलमानला चिडवत म्हणतो, 'एकाच वेळी पाच गर्लफ्रेंड' तर सलमान खान म्हणतो, 'तुला तर माहिती आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला फक्त पाच गर्लफ्रेंड होत्या आणि त्याच खूप दिवस राहिल्या. सलमान खानचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

सलमान खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून अनेक अभिनेत्रींसोबतच्या अफेअरच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण ज्याच्या-ज्याच्याशी सलमानचं नाव जोडलं गेलं त्या सर्व अभिनेत्रींने लग्न केलं, मात्र आजपर्यंत भाईजान सलमान अविवाहित आहे. मात्र सलमान खान लग्न का करत नाही आणि तो कधी लग्न करणार, याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच त्याचा 'टायगर 3' हा चित्रपट 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. यात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपट 'टायगर 3' चे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटी