Join us  

Video: शाहरुखच्या 'मन्नत' समोरुन सायकल चालवत गेला सलमान खान, जोरात ओरडून म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 3:57 PM

शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यासमोर नेहमीप्रमाणे चाहत्यांची गर्दी आहे. सलमान ज्यावेळी मन्नत समोरुन जातो तेव्हा...

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची (Salman Khan) स्टाईल, त्याचा ऑरा कायमच वेगळा असतो. तो जिथे जातो तिथे सगळ्यांची नजर त्याच्याकडेच वळते. सलमानला सायकल चालवण्याचीही आवड आहे. पूर्वी तो मुंबईत बिंधास्त सायकल चालवायचा. तेव्हा त्याच्या मागोमाग बॉडीगार्ड्स असायचे. सलमानची झलक पाहून चाहतेही वेडेच व्हायचे. असाच सलमानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये तो शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'मन्नत' बंगल्यासमोरुन जाताना दिसतोय.

सलमान खानमुंबईतील बांद्रा बँडस्टँड या उच्चभ्रू परिसरात राहतो. गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये त्याचा फ्लॅट आहे. तर बँडस्टँडच्या दुसऱ्या टोकाला शाहरुख खानचा भव्य 'मन्नत' बंगला आहे. सोशल मीडियावर सलमानचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतोय. यामध्ये तो बँडस्टँड परिसरात सायकल चालवण्याचा आनंद घेतोय. शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यासमोर नेहमीप्रमाणे चाहत्यांची गर्दी आहे. सलमान ज्यावेळी मन्नत समोरुन जातो तेव्हा जोरात 'शाहरुख खान' असा आवाज देतो आणि हसतो. शाहरुखच्या चाहत्यांचं सलमानकडे लक्ष जातं तोवर तो सायकलवरुन पुढे निघून जातो.

भाईजानचा हा अंदाज सगळ्यांनाच आवडलाय. हा व्हिडिओ 2017 चा म्हणजेच ७ वर्षांपूर्वीचा आहे. ससमाननेच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला होता. सलमानने त्याच्या 'बीइंग ह्युमन'ब्रँडखाली सायकल लाँच केल्या होत्या. त्यापैकीच एका सायकलवर त्याने फेरफटका मारला. शाहरुख खानचाही एकदा सलमानसोबत सायकलवर पोज देतानाचा फोटो व्हायरल झाला होता.

सलमान आणि शाहरुखची जोडी कायम सुपरहिट असते.  'करण अर्जुन' ते आता 'पठाण','टायगर 3' मध्ये त्यांनी एकत्र काम केलं. प्रेक्षकांना दोघांना एकत्र पाहण्याची कायम उत्सुकता असते.

टॅग्स :सलमान खानशाहरुख खानमुंबईसायकलिंगबॉलिवूडसोशल मीडिया