Join us

सोनाक्षीच्या रिसेप्शन पार्टीत दिसला शेराचा मुलगा, सलमान खान बॉडीगार्डच्या लेकाला लाँच करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:33 IST

वडिलांप्रमाणेच उंच, बॉडीबिल्डर असा हा शेराचा मुलगा अबीर.

अभिनेता सलमान खानची (Salman Khan)  नेहमी सावली बनून फिरणारा बॉडीगार्ड शेरा (Shera) तर सर्वांनाच माहित आहे. काल सोनाक्षी आणि जहीरच्या रिसेप्शन पार्टीत सलमानने खाननेही हजेरी लावली. सोबत बॉडीगार्ड शेरा तर होताच पण यावेळी शेराच्या मुलाने सर्वांचंच लक्ष वेधलं. शेराने लेकासोबत पापाराझींना पोज दिली तेव्हा सर्वांची नजर त्याच्या मुलावर पडली. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

वडिलांप्रमाणेच उंच, बॉडीबिल्डर असा हा शेराचा मुलगा अबीर. अबीर सलमान खानला त्याचा गॉडफादर मानतो. काल पहिल्यांदाच त्याची झलक दिसली. वडिलांसोबत त्याने पापाराझींना पोज दिली. शेराप्रमाणेच अबीरही अगदी रफ अँड टफ लूकमध्ये दिसतोय. ब्लॅक शर्ट, ब्लू जीन्स, वाढलेले केस आणि लांब दाढी अशा लूकमध्ये तो काल सोनाक्षीच्या रिसेप्शन पार्टीत आला होता. त्याचा गंभीर लूक लक्ष वेधून घेणारा आहे. शेरा आणि अबीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सलमान खान शेराच्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची चर्चा गेल्या २ वर्षांपासून सुरु आहे. मात्र अद्याप अबीरच्या लाँचची हालचाल होताना दिसत नाही. अबीर सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह आहे. ११ हजारांहून जास्त लोक त्याला फॉलो करतात.

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीबॉलिवूड