Join us

आजही सलमानवर आहे संगीता बिजलानीचं प्रेम?; ईद पार्टीतील 'तो' व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 6:15 PM

Sangeeta bijlani: बऱ्याच वर्षांनंतर ही जोडी एकत्र आली असून अजूनही संगीताचं सलमानवर प्रेम आहे की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) आणि संगीता बिजलानी (sangeeta bijlani) यांच्या प्रेम प्रकरणाविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. एकेकाळी या दोघांची लव्हस्टोरी बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजली होती. इतकंच नाही तर या दोघांनी लग्नाचाही निर्णय घेतला होता. मात्र, काही कारणास्तव त्यांच्या नात्यात फूट पडली आणि दोघांचेही मार्ग वेगळे झाले. परंतु, बऱ्याच वर्षांनंतर ही जोडी एकत्र आली असून अजूनही संगीताचं सलमानवर प्रेम आहे की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

अलिकडेच सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांनी ईदच्या निमित्ताने पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, संगीता आणि सलमान यांच्यातील मैत्री पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे. या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये संगीता आणि सलमान या पार्टीमधून बाहेर पडताना दिसत आहेत. इतकंच नाही तर सलमान तिच्याविषयी काही तरी बोलत आहे. त्यामुळे त्याचं बोलणं ऐकून संगिताने त्याला तोंड बंद कर असं सांगण्यासाठी एक खोटा ठोसा मारते. विशेष म्हणजे यावेळी या दोघांमधील मैत्री पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नात्याविषयी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, यापूर्वीही संगीताने सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीतून बाहेर पडत असताना सलमान तिला गाडीपर्यंत सोडायला आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे. संगीता आणि सलमान यांनी जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. या दोघांच्या लग्नपत्रिकाही छापल्या होत्या. मात्र, काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर संगीताने १९९६ मध्ये क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले पण १४ वर्षानंतर ते दोघेही वेगळे झाले. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा