Join us  

आधी वडिलांना धमकी, आता सलमान खानच्या ताफ्यात अचानक घुसला दुचाकीस्वार, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:57 PM

सलमानच्या चाहत्यांना चितेंत टाकणारी आणखी एक घटना घडली. 

Salman khan :  बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या घराबाहेर एप्रिल महिन्यात गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सलमान खानचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान यांना एका अज्ञात बुरखाधारी महिलेने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली आहे. सलीम खान हे मॉर्निंग वॉकला गेले असताना ही घटना घडली होती. यानंतर आता पुन्हा एक दुचाकीस्वार अचानक सलमान खानच्या ताफ्यात घुसल्याची घटना घडली आहे. 

नुकतंच सलमान खानचे वडील सलीम खान यांना मॉर्निंग वॉक करताना एका तरुणीने धमकी दिल्याचा प्रकार नुकतंच घडला होता. सलीम खान वांद्रे येथे असलेल्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमधून पहाटे मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. त्याचवेळी एका बाईकस्वाराने त्यांचा रस्ता अडवला. दोघांपैकी एकाने बुरखा घातला होती. ती महिला होती. त्या महिलेने सलीम खान यांना अडवून "लॉरेन्स बिश्नोईला पाठवू काय?" असं विचारलं. 

सलीम यांना धमकी देताच ते दोघे पळून गेले. यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या तरुणीसह एक तरुणाला अटक केली होती.  अटक करण्यात आलेला आरोपी हा किरकोळ गुन्हेगार आहे. बुरखा घातलेली महिला त्या स्कूटर चालवणाऱ्या इसमाची गर्लफ्रेंड होती. तिच्यावर इंप्रेशन पाडण्यासाठीच त्याने सलमानला धमकी देण्याचा प्लान आखला होता. मात्र याप्रकरणी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असून चौकशी सुरू आहे. या घटनेला काही तासही उलटत नाहीतर सलमानच्या चाहत्यांना चितेंत टाकणारी आणखी एक घटना घडली. 

सलमान खानला सुरक्षा देत असलेल्या पोलिसांच्या ताफ्यात एक दुचाकीस्वार अचानक घुसला. बुधवारी रात्री 12.15 च्या सुमारास सलमान खानचा ताफा माहुब स्टुडिओजवळून जात असताना एक 21 वर्षीय उझैर फैज मोईउद्दीन नावाच्या दुचाकीस्वाराने सलमान खानच्या कारजवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याला बजावले. मात्र,  तो सलमान खानच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. अखेर पोलिसांनी त्याला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडपोलिसमुंबई