बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman khan) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकीचा मेल पाठविण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली. सतत मिळत असलेल्या या धमक्यांमुळे आता सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जर सलमानची गळाभेट घ्यायची असेल तरीदेखील आता आधारकार्ड प्रथम दाखवावं लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सलमानच्या किसी की भाई किसी की जान या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या ट्रेलर लॉन्चपूर्वी एक पत्रक जाहीर करण्यात आलं. यात रविवारी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये येण्यापूर्वी प्रत्येकाला आधारकार्ड सोबत घेऊन येणं आनिर्वाय असल्याचं सांगण्यात आलं आहे.
'मुलींनी डिपनेक लाइनचे कपडे..'; सिनेमाच्या सेटवर मुलींसाठी भाईजानचा खास नियम
दरवर्षी मुंबईतील बांद्रा येथे बाबा सिद्दीकी यांच्याकडे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी रविवारील १६ तारखेला या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्टीमध्ये सलमान खानसह शाहरुख खानदेखील त्याच्या कुटुंबासह हजेरी लावणार आहे. मात्र, सलमानला येत असलेल्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या पार्टीत येणाऱ्या प्रत्येकाची पोलीस कसून चौकशी करणार आहेत. इतकंच नाही तर, या पार्टीत सहभागी होणाऱ्या पत्रकारांचे आधारकार्डही गुरुवारी चेक केले जाणार आहेत.
दरम्यान, यापूर्वीही किसी का भाई किसी जान या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान प्रत्येकाची काळजीपूर्वक चौकशी करण्यात आली होती. इतकंच नाही तर सलमानच्या आवतीभोवती पोलिसांचा गराडा होता. सलमानच्या घराशेजारीही सुरक्षेमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे.